Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Goa Politics: याप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेऊन आठ दिवसांत चौकशी करावी, अशी मागणी विरियातो फर्नांडिस यांनी केली आहे.

Pramod Yadav

पणजी: पेडण्याच्या आजी – माजी आमदारांनी एकमेकांवर गांजावरुन आरोप केले. या आरोपानंतर राज्यात खळबळ निर्माण झाली. आप नेते अमित पालेकरांनी याप्रकरणी चौकशी न झाल्यास एनसीबीकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर आता काँग्रेस खासदार विरियातो फर्नांडिस यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

माजी आमदार बाबू आजगावकरांनी विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकरांवर गंभीर आरोप केला. गांजा विक्री करणारा व्यक्ती आमदार असल्याचे आजगावर म्हणाले. होते. यावरुन आर्लेकरांनी प्रत्युत्तर देताना आजगावकरांचा मुलगा डिस्कोत गांजा विक्री करतो असा आरोप केला.

याप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेऊन आठ दिवसांत चौकशी करावी, अशी मागणी विरियातो फर्नांडिस यांनी केली आहे.

 “आमदार आर्लेकर आणि माजी उपमुख्यमंत्री आजगावकरांनी गांजावरुन एकमेकांवर आरोप केले. आठ मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी सुरु करवी, अन्यथा आम्ही याप्रकरणी तक्रार दाखल करु,” असा इशारा विरियातो यांनी दिला आहे.

यापूर्वी आप नेते अमित पालेकरांनी देखील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

“राज्यात अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढले आहे. भाजपचे दोन नेते आजी – माजी आमदार एकमेकांवर गांजा विक्रीचे आरोप करतात. याचे व्हिडिओ सोशल मिडियावर उपलब्ध आहेत. सामान्य नागरिकाने असे आरोप केले असते तर आत्तापर्यंत चौकशी झाली असते,” असेही पालेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT