Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटकांनी खरचं गोव्याकडे पाठ फिरवलीय का, सरकारी आकडेवारी काय सांगते? वाचा

Goa Visitors in 2024: देशी आणि विदेशी पर्यटक गोव्‍यात येण्‍यापेक्षा थायलंड, व्‍हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांत जाणे पसंद करतात, अशा तऱ्हेचा प्रचार सामाजिक माध्‍यमांवरून काहीजणांनी करण्‍याचा प्रयत्‍न केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

71 Lakh Tourist Visited Goa in 2024

मडगाव: गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या कमी झाली, असा आक्राेश समाज माध्‍यमांवरून सुरू असला तरी सरकारी आकडेवारीप्रमाणे, मागच्‍या काही वर्षांच्‍या तुलनेत गोव्‍यात यावर्षी आलेल्‍या पर्यटकांची संख्‍या दिलासादायक असून पर्यटन खात्‍याकडून जी अधिकृत माहिती उपलब्‍ध झाली, त्‍यानुसार तब्‍बल ७१.८४ लाख पर्यटकांनी यंदाच्‍या पहिल्‍या ९ महिन्‍यांत गोव्‍याला भेट दिली आहे.

देशी आणि विदेशी पर्यटक गोव्‍यात येण्‍यापेक्षा थायलंड, व्‍हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांत जाणे पसंद करतात, अशा तऱ्हेचा प्रचार सामाजिक माध्‍यमांवरून काहीजणांनी करण्‍याचा प्रयत्‍न केला होता. मात्र, वस्‍तुस्‍थिती तशी नाही, अशी माहिती पर्यटन खात्‍याच्‍या सूत्रांनी दिली. पर्यटन खात्‍याच्‍या आकडेवारीनुसार जानेवारी ते सप्‍टेंबर या यंदाच्‍या पहिल्‍या ९ महिन्‍यांत गोव्‍याला ६९,२४,९३८ देशी पर्यटकांनी तर २,५९,८२० विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. ही एकूण संख्‍या ७१,८४,७५८ एवढी असून शेवटच्‍या तीन महिन्‍यांत ही संख्‍या बरीच वाढण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

२०१९ ते २०२१ या तीन वर्षांत संपूर्ण जगाला कोविड लाटेने ग्रासल्‍यानंतर गोव्‍यातील पर्यटकांची संख्‍या एकदम कमी झाली होती. मात्र, गोवा हळूहळू या स्‍थितीतून सावरला आहे. यंदा गोव्‍याला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. पोलंड, रशिया, कझाकिस्तान, उझबेकिस्‍तान आणि युनायटेड किंगडम या पाच देशांतून चार्टर विमाने विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्‍यात आली आहेत.

दक्षिण गोव्‍याला अधिक प्राधान्‍य

भारतीय लाेकांना इयर एण्‍ड साजरे करण्‍यासाठी कुठे जावेसे वाटते, याबद्दल ‘गुगल’च्‍या माध्‍यमांतून जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता, भारतीय लोकांनी जी इयर एण्‍डींग डेस्‍टीनेशन्‍स सर्च केली आहेत, त्‍यात दक्षिण गोव्‍यालाही स्‍थान असून पहिल्‍या टॉप टेन डेस्‍टीनेशन्‍समध्‍ये दक्षिण गोव्‍याचा समावेश झाला आहे.

अझरबैजान प्रथम क्रमांकावर

इयर एण्‍डींगसाठी पहिल्‍या ९ डेस्‍टीनेशन्‍समध्‍ये अझरबैजान हे पर्यटनस्‍थळ पहिल्‍या क्रमांकावर आहे. इंडोनेशियातील बाली शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारतातील मनाली हे तिसऱ्या पसंतीचे शहर असून त्‍यानंतर कझाकिस्‍तान, जयपूर, जॉर्जिया, मलेशिया, अयाेध्‍या व काश्‍‍मीर या डेस्‍टीनेशन्‍सचा क्रमांक लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT