Indigo  Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: धक्कादायक! गोवा ते मुंबई जाणाऱ्या इंडिगो विमानाला धावपट्टीवरच आग

‘इंडिगो’चे आपत्कालीन लँडिंग, चार मुलांसह 187 प्रवासी सुखरूप

दैनिक गोमन्तक

वास्को: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मंगळवारी (ता.२३) दुपारी गोवा ते मुंबई जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या मागच्या बाजूस इंजिनाला आग लागल्याची घटना घडली. मात्र, ही गोष्ट समजताच प्रसांगवधान राखून विमानतळावरच विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले. विमानात चार मुलांसह 187 प्रवासी तर ‘इंडिगो’चे चार कर्मचारी होते. सायंकाळी 6 वा. दुसऱ्या विमानाने सर्व प्रवाशांना मुंबईला पाठवण्यात आले.

(IndiGo flight from Goa to Mumbai caught fire on the runway)

दाबोळी विमानतळावर मंगळवारी दुपारी 1:30 वा. इंडिगो प्रवासी विमानाने (6 ई 6097) प्रवासी गोवा ते मुंबई धावपट्टीवरून जाण्याच्या तयारीत असताना विमानाच्या मागच्या बाजूस इंजिनला आग लागल्याने तेथे उपस्थित असलेल्या नौदलाच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित पुढील कारवाई करून विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूपरीत्या बाहेर काढले. नंतर विमानाच्या इंजिन रूमला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणले. विमानातील सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. इंडिगो विमानातील सर्व प्रवाशांना सायंकाळी 6 वा. दुसऱ्या विमानाने मुंबईला पाठवण्यात आले. दाबोळी विमानतळ आणि नागरी वाहतूक विमान प्राधिकरणाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT