Indigo flights stopped from goa Dainik Gomantak
गोवा

Indigo Flights: गोव्‍यातून इंडिगोची 6 शहरांची विमानसेवा स्‍थगित! गोमंतकीयांना फटका बसण्‍याची शक्‍यता; 'हे' कारण आले समोर

Indigo flights stopped from goa: इंडिगो दाबोळी विमानतळावरून भोपाळला सात फेऱ्यांची सेवा देत होती. परंतु, गेल्‍या काही महिन्‍यांपासून एअरलाईन्‍सला कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : कर्मचाऱ्यांसह प्रवाशांच्‍याही कमतरतेमुळे इंडिगो एअरलाईन्‍सने गोव्‍यातून सुरत, भुवनेश्‍‍वर, राजकोट, वडोदरा, चंदीगड आणि भोपाळ या सहा शहरांमधील विमानसेवा स्‍थगित केली आहे. ‘इंडिगो’च्‍या या निर्णयामुळे या सहा शहरांमध्‍ये उद्योग-व्‍यवसायानिमित्त जाणाऱ्या गोमंतकीयांना फटका बसण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो विमानाच्‍या सुरतला आठवड्यातून एकदा भुवनेश्वरला तीनवेळा तसेच राजकोट, वडोदरा आणि चंदीगडला सातवेळा फेऱ्या होत होत्‍या.

याशिवाय इंडिगो दाबोळी विमानतळावरून भोपाळला सात फेऱ्यांची सेवा देत होती. परंतु, गेल्‍या काही महिन्‍यांपासून एअरलाईन्‍सला कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.

सोबतच सध्‍या उन्‍हाळ्याचे दिवस असल्‍याने गोव्‍यात या सहा शहरांमध्‍ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांतही घट होत असल्‍याने आर्थिक फटका बसू नये, यासाठी या सहा शहरांमधील सेवा तुर्तास स्‍थगित करण्‍याचा निर्णय ‘इंडिगो’ने घेतला आहे. पण पावसाळ्याच्‍या दिवसांत ही सेवा पुन्‍हा सुरू होणार असल्‍याची माहिती सूत्रांनी ‘गोमन्‍तक’ला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT