India's first mobile BSL-3 LAB Dainik Gomantak
गोवा

India's first mobile BSL-3 LAB: भारतातील पहिली मोबाइल BSL-3 लॅब; G20 बैठकीत झाले प्रदर्शन Video

भारताचा मोबाईल क्लिनिक उपक्रम BSL-3 लॅब पणजीतील दुसऱ्या G20 हेल्थ वर्किंग ग्रुपच्या बैठकीत प्रदर्शित करण्यात आला.

Pramod Yadav

India's first mobile BSL-3 LAB: दुसऱ्या जी20 आरोग्य कृतीगटाची बैठक सध्या गोव्यात सुरू आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी आज गोव्यात खोर्ली येथील आयुष्मान भारत, आरोग्य आणि कल्याण केंद्राला (AB-HWC) भेट दिली. आरोग्य सेवा क्षेत्रातील गोव्याच्या क्षमतेचे यावेळी डॉ. मांडविया यांनी कौतुक केले.

दरम्यान, भारताचा मोबाईल क्लिनिक उपक्रम BSL-3 लॅब पणजीतील दुसऱ्या G20 हेल्थ वर्किंग ग्रुपच्या बैठकीत प्रदर्शित करण्यात आला.

BSL-3 लॅब पूर्णपणे भारतात बनवलेली लॅब आहे आणि ती देशाची स्वावलंबी क्षमता दर्शवते. तसेच भविष्यात साथीचे आजार उद्भवल्यास ही बस देशाच्या दुर्गम भागात पोहोचू शकते. यासोबतच यात जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. याद्वारे, चाचणीनंतर लगेच अहवाल पाठविला जाऊ शकतो. अशी माहिती ICMR सदस्य डॉ. रजनीकांत यांनी दिली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि मुंबईस्थित जैव-सुरक्षा उपकरणे निर्मात्या क्लीनझाइड्स यांनी संयुक्तपणे 25 कोटी रुपये खर्च करून ही मोबाइल लॅब विकसित केली आहे.

महामारी तयारीसाठी अत्याधुनिक आरोग्य पायाभूत सुविधेचा वापर करून ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली असून, तिला रामबाण असे नाव देण्यात आले आहे. RAMBAAN (Rapid Action Mobile BSL3+ Advanced Augmented Network)

पणजी, गोवा येथे दुसऱ्या G20 आरोग्य कार्य गटाच्या बैठकीत या प्रयोगशाळेचे प्रदर्शन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT