Green School |Goa News Dोग
गोवा

Green School: देशातील पहिली ग्रीन शाळा गोव्यात सुरू

देशातील पहिल्या ग्रीन शाळेचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विठ्ठलापूर-साखळी येथे करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Green School: राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिल्या ग्रीन शाळेचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विठ्ठलापूर-साखळी येथे करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवभारत संकल्पना पूर्ततेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अन्य राज्याच्या तुलनेत गोवा राज्य शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर आहे. केजी ते पीजीपर्यंत शिक्षण उपलब्ध असलेला डिचोली हा एकमेव तालुका आहे.

नवीन शिक्षण धोरणाला अनुसरून शाळांनी साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आग्रही आहे. पुढील वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

सुरवातीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नामफलकाचे अनावरण आणि फित कापून इमारतीचे उदघाटन केले. नंतर स्वामी विवेकानंद आणि श्री सरस्वती मूर्तीचे अनावरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.

कल्पना मळीक यांनी प्रास्ताविक केले. स्वाती पूजारी आणि धावस्कर यांनी सूत्रसंचालन केले. या सोहळ्यास अन्य मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यास मयेचे आमदार तथा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिश अडकोणकर, कारापूरचे सरपंच दत्तप्रसाद खारकंडे, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे आदी उपस्थित होते. सरकारच्या पाठिंब्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागल्याचे आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले.

ग्रीन शाळेची खासियत

  • एकूण 14 खोल्या : खर्च 5.29 कोटी रुपये

  • विठ्ठल-रखुमाई सरकारी शाळा असे नामकरण

  • भविष्यातील विस्तारासाठी आणि इतर उपक्रमांसाठी अत्याधुनिक दुमजली इमारत.

  • मराठी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथीसाठी प्रत्येकी 2 वर्गखोल्या

  • उर्दू माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी दोन वर्गखोल्या.

  • संगीत आणि नृत्य शिक्षणासाठी समर्पित वर्ग खोल्या.

  • एक अ‍ॅक्टिव्हिटी रूम, वाचनालय आणि स्पेस थीम ध्यान कक्ष.

  • दोन हजार चारशे चौ.मी. जागेत उभारली इमारत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT