Rajnath Singh X
गोवा

Rajnath Singh: .. तुम्ही देशाचा सन्मान वाढविला! सागर परिक्रमा पूर्ण करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे संरक्षणमंत्र्यांनी केले कौतुक

Rupa A. and Dilna K. Navy journey: ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर या दोघींनी देशाचा सन्मान अधिक वाढविला आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

Sameer Panditrao

वास्को: लेफ्टनंट कमांडर रूपा ए. आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के. यांनी आठ महिन्यांमध्ये नाविक सागर परिक्रमा पूर्ण करून मोठी कामगिरी केली असून त्यांच्या कर्तृत्वाचा देशवासीयांना मोठा अभिमान आहे. हा एक ऐतिहासिक दिवस आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर या दोघींनी देशाचा सन्मान अधिक वाढविला आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे गुरुवारी (ता. २९) एका कार्यक्रमात केले.

भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर रूपा ए. आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के. यांनी ‘तारिणी’ या शिडाच्या बोटीमधून आठ महिन्यांत सागर परिक्रमा पूर्ण केली. त्यांच्या स्वागतासाठी मुरगाव बंदरात आयोजिलेल्या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

रूपा ए. आणि दिलना के. यांचे मुरगाव बंदरात आगमन झाल्यावर नौदलाचे हेलिकॉप्टर आणि शिडाच्या बोटींनी स्वागत करून त्यांना धक्क्यावर आणले. तेथे राजनाथ सिंह आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आणि इतर नौदल अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

ॲडमिरल त्रिपाठी यांनी आजचा दिवस देशासाठी व नौदलासाठी प्रेरणा दिवस असल्याचे सांगितले. या दोघींनी साहस, संकल्प व इच्छाशक्तीचे रूप दाखविले आहे. त्यांच्या कामगिरीतून युवक-युवतींना प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले. रूपा ए. यांनी आई तसेच पतीने दिलेल्या प्रोत्साहन व पाठिंबाचा उल्लेख केला. त्यांनी पतीचे खास कौतुक केले.

होय... आम्ही ते साध्य व सिद्ध केले, अशा शब्दांत रूपा ए. आणि दिलना के. यांनी मनोगत व्यक्त केले. आशा व धैर्याच्या जोरावर आम्ही ही कामगिरी केली. सागरात आम्ही राष्ट्रध्वज, नौदलाचा ध्वज दिमाखाने फडकाविला. कोणत्याही आव्हानाला शेवट नसतो. आम्ही सागरात प्रत्येक गोष्टीचा सामना करून भारतीय नारी काय करू शकते, हे दाखवून दिले आहे. यापासून इतरांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

Margao Dindi Utsav: 'पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’, आनंद पर्वणी दिंडी महाेत्‍सव

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! एकाचा मृत्यू

Bicholim Car Accident: नियंत्रण सुटलं अन् कार नदीत कोसळली... चालकाची जीव वाचवण्यासाठी धडपड, सुदैवाने बचावला; डिचोलीतील घटना

SCROLL FOR NEXT