Indian Navy officers blocks road leading to temple in Vasco Mangor Hill area Dainik Gomantak
गोवा

वास्को मांगुरहिल परिसरात मंदिरात जाणारा रस्ता भारतीय नौसैनिकांनी केला बंद

मंदिराच्या समितीबरोबर स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच सर्वांनी नौसैनिकांच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

वास्को मांगुरहिल परिसरातील श्री अय्यप्पा मंदिरात जाणारा रस्ता भारतीय नौसैनिकांनी सोमवारी रात्री दगड टाकून बेकायदेशीररित्या बंद केला. मंदिराच्या समितीबरोबर स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच सर्वांनी नौसैनिकांच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला.

सदर घटनेची माहिती मिळताच वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्रीमती रुचिका कटियार, मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जागेची पाहणी केली; तसेच नौसैनिकांच्या अधिकारी वगाॆला पाचारण केले. (Indian Navy officers blocks road leading to temple in Vasco Mangor Hill area)

जिल्हाधिकारी कटियार आणि उपजिल्हाधिकारी देसाई यांनी बुधवार (दि.27) पर्यंत भारतीय सैनिकांना जागेचे कागदपत्र घेऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश जारी केला आहे. आमदार साळकर यांनी वास्को नौसैनिक गोवा शिपयार्ड आणि इतर केंद्रशासित अधिकाऱ्यांनी स्थानिक जनतेची सतावणूक थांबवावी, अन्यथा याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा दिला. गोवा तटरक्षक दल व भारतीय नौसैनिकाने मुरगाव तालुक्यातील विविध प्रकारे बेकायदेशीररित्या गोवावासियांच्या जमिनीवर अतिक्रमण केले असून याविरोधात भविष्यात आम्हाला केंद्रशासित आस्थापना विरोधात एकजूट होऊन लढावे लागणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे युवानेते ॲड. सुनील लॉरेन यांनी दिली.

सदर रस्ता अय्यप्पा मंदिराजवळ जाण्यासाठी सरकारतर्फे मुक्त वितरीत प्रक्रियेअंतर्गत (ओडिपी) करण्यात आला असून भारतीय नौसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर दगड टाकून गुन्हा केला असल्याने, त्यांच्याविरोधात संबंधित विभागाने पोलिसात तक्रार दाखल करण्याची मागणी ॲड. लॉरेन यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून भारतीय नौसैनिक आपली मनमानी करून राज्य सरकारच्या विरोधात जाऊन वास्कोतील जमिनीवर अतिक्रमण करीत असल्याच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी रात्री मंदिरात जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याने पुन्हा एकदा केंद्रशासित आस्थापनाच्या व सैनिकांनी आपली मनमानी सुरू केल्याने मंदिराच्या समितीबरोबर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आवाज उठवला. वातावरण तंग होणार असल्याची माहिती मिळताच वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्रीमती रुचिका कटियार, मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस देसाई, अय्याप्पा मंदिराचे चेअरमन युवा अध्यक्ष शशीधरन नायर, पी सी प्रसाद, स्थानिक रहिवासी, ॲड सुनील लॉरेन व इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कटियार याने भारतीय सैनिकांना त्यांच्या जवळील सर्व कागदपत्रे घेऊन घेऊन बुधवारी (दि.27) मुरगावचे उपजिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे, तसेच लोकवस्तीत जाऊन कायदा हातात घेऊ नये असा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT