Indian Navy MARCOS Meet US Navy SEALs In Goa: भारतीय नौदलाच्या मरीन कमांडो आणि अमेरिकेच्या सील नौदल सैनिकांनी गोव्यात 23 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 8 वा संयुक्त विशेष सागरी सैन्य सराव केला. दोन्ही देशाच्या नौदल सैनिकांमध्ये विशेष सहकार्य वाढवण्यासाठी हा सराव फायदेशीर ठरणार आहे.
दोन्ही देशाच्या विशेष सैन्यदलांनी एकत्र सराव करण्याची ही पहिलीच वेळ नाही. डिसेंबर 2022 मध्ये, गोव्यात भारतीय नौदलाचे मार्कोस आणि युनायटेड स्टेट्स नेव्ही सील यांच्या संयुक्त विद्यमाने नौदलाचा विशेष 'संगम' सैन्य सराव आयोजित करण्यात आला होता.
लष्करी आणि राजकीय सहकार्याचा प्रयत्न म्हणून 1994 पासून दोन्ही देशात सराव संगम केला जा आहे. आयएनएस अभिमन्यूमधील भारतीय नौदलाचे मार्को आणि सॅन दिएगो येथील सील टीम फाइव्हमधील सैनिकांनी सागरी विशेष ऑपरेशन्सबद्दल विविध विषयांवर त्यांचे विचार आणि अनुभव शेअर केले.
संगम सराव एकूण तीन आठवडे सुरु होता. याकाळात, कर्मचार्यांनी विविध विभागात सराव करत त्यांची क्षमता विकसित केली. यात सागरी प्रतिबंध ऑपरेशन्स, डायरेक्ट अॅक्शन मिशन्स, कॉम्बॅट फ्री-फॉल जंप्स, स्पेशल हेलिबोर्न ऑपरेशन्स यासह विविध गोष्टींचा समावेश होता.
2018 च्या RIMPAC सरावाच्या संदर्भात दोन विशेष दलांच्या प्रशिक्षणाचाही उल्लेख करण्यात आला. रिपब्लिक ऑफ कोरिया नेव्ही स्पेशल वॉरफेअर फ्लोटिला (ROK SEALs), फिलिपिन्स नेव्ही स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (NAVSOG), इंडोनेशियन नेव्ही स्पेशल फोर्सेस (KOPASKA), इंडियन नेव्ही मरीन कमांडो फोर्स (MARCOS), पेरुव्हियन नेव्हल स्पेशल फोर्सेस (FOE), यांचा SOF समावेश आहे.
MARCOS प्रशिक्षणाचा एक भाग नेव्ही सीलच्या प्रशिक्षणावर आधारित असल्याचे सांगितले जाते आणि ब्रिटिश SAS ने MARCOS प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात योगदान दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.