Indian football player Gouramangi Singh  Dainik Gomantak
गोवा

गौरमांगी एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक

माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉल; क्लिफर्ड मिरांडा यांच्या जागी नियुक्ती

Sumit Tambekar

पणजी; भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू गौरमांगी सिंग यांची एफसी गोवाने सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ते क्लिफर्ड मिरांडा यांची जागा घेतील. गौरमांगी यांच्या नियुक्तीची माहिती एफसी गोवातर्फे बुधवारी देण्यात आली. आगामी मोसमात ते मुख्य प्रशिक्षक कार्लोय पेनया यांचे सहाय्यक असतील. (Indian football player Gouramangi Singh appointed as FC Goa assistant coach )

``एफसी गोवा संघात रुजू होताना मला अतिशय आनंद होत आहे. हा क्लब आणि त्यांचा फुटबॉलमधील दर्जा मी जाणून आहे. माझ्या प्रशिक्षण कारकिर्दीचा विचार करता, योग्य दिशेने पाऊल टाकल्याचे मानतो. गोवा माझ्यासाठी दुसरे घर आहे, या राज्यात मी कित्येक वर्षे खेळलो आहे. येथे परत येना खरोखरच संतोष वाटत आहे,`` असे गौरमांगी यांनी एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले.

आयएलएल पदार्पण एफसी गोवाविरुद्ध

चेन्नईयीन एफसी संघातर्फे खेळत असताना गौरमांगी यांनी एफसी गोवाविरुद्ध आयएसएल फुटबॉल स्पर्धेत पदार्पण केले होते. ``पहिला आयएसएल सामना मी एफसी गोवाविरुद्ध फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळलो. या स्टेडियमवरील वातावरण विलक्षण असते आणि चाहते क्लबवर प्रेम करतात. यापूर्वी याचा अनुभव मी प्रतिस्पर्धी खेळाडू या नात्याने घेतला आहे. आता मला या क्लबच्या विकासात सकारात्मक योगदान द्यायचे आहे,`` असे 36 वर्षीय गौरमांगी यांनी सांगितले.

फुटबॉलमधील परिचित व्यक्तिमत्त्व

``गौरमांगी हे भारतीय फुटबॉलमधील परिचित व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याविषयी माझी आणि मुख्य प्रशिक्षकाची चर्चा झाली. आमच्या संघासाठी ते सांस्कृतिकदृष्ट्या आणि प्रशिक्षणासाठी योग्य असल्याचे मत बनले. विविध टप्प्यांवरील त्यांचा भारतीय फुटबॉलमधील प्रदीर्घ अनुभव मुख्य प्रशिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. त्यांची उपस्थिती आणि खेळण्याचा अनुभव संघातील खेळाडूंनी निश्चितच फायदेशीर ठरेल,`` असा विश्वास एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी व्यक्त केला.

भारताचा सफल बचावपटू

मणिपूर येथील गौरमांगी यांना भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघातील सफल बचावपटू मानले जाते. ते संघात असताना भारताने 2007 व 2009 असे दोन वेळा नेहरू करंडक, 2008 मध्ये एएफसी चॅलेंज कप व सॅफ कप जिंकला. भारतातर्फे ते 70 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

2018 पासून प्रशिक्षक

निवृत्तीनंतर 2018 पासून गौरमांगी प्रशिक्षकाच्या भूमिकेत स्थिरावले. 2019 मध्ये त्यांनी प्रशिक्षणातील एआयएफएफ परवाना प्राप्त केला. मागील तीन मोसम ते बंगळूर युनायटेड संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते.

भारतीय फुटबॉलमधील दिग्गज

गौरमांगी सिंग जमशेदपूर येथील टाटा फुटबॉल अकादमीत माजी प्रशिक्षणार्थी

सेंटरबॅक खेळाडूची देशातील विविध क्लबतर्फे 15 वर्षांची कारकीर्द

गोव्यातील धेंपो स्पोर्टस क्लबतर्फे 200४-05 मध्ये राष्ट्रीय साखळी फुटबॉल (एनएफएल) व फेडरेशन कप विजेतेपद

मुंबईच्या महिंद्र युनायटेडतर्फे खेळतानाही यशस्वी

2007 ते 2012 या कालावधीत गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सतर्फे आय-लीग (2008-09), प्रत्येकी दोन वेळा आयएफए शिल्ड (2009, 2011) व ड्युरँड कप (2009, 2011) जेतेपद

2008-09 मध्ये सर्वोत्तम आय-लीग बचावपटू, 2010 मध्ये एआयएफएफतर्फे वर्षातील सर्वोत्तम भारतीय पुरुष फुटबॉलपटू पुरस्काराची निवड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT