Bison Killed In Accident  Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या धडकेत गवा ठार

बराचकाळ मृत गवा रस्त्यात पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

Pramod Yadav

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) वाहनाच्या धडकेत गवा ठार झाला आहे. ओसरगाव, कणकवली (Osargao, Kankavli) येथी मंगळवारी रात्री 12.15 वा. हा अपघात झाला. अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला. बराचकाळ मृत गवा रस्त्यात पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री झालेल्या अपघातानंतर स्थानिकांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलिसांच्या मदतीने मृत गव्याला बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने मृत गव्याला ट्रॅक्टरमध्ये भरून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचे दहन करण्यात आले.

दरम्यान, यापूर्वी गव्याचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच, याप्रकरणी वन विभागाने अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT