Yuvraj Singh Dainik Gomantak
गोवा

Yuvraj Singh Holiday Home in Goa: गोवा पर्यटन खात्याचा 'युवराज' ला दणका; हॉलिडे घराबाबत दिला मोठा आदेश

युवराज सिंग याला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे न्यायालयाचे आदेश

Sumit Tambekar

भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) गोव्यात अलिशान घर आहे. सुंदर इंटेरिअर असलेले हे घर गोव्यातील मोरजी (Morjim, Goa) येथील निसर्गरम्य परिसरात उभारलेले आहे. 'कासा सिंग' असे युवराज सिंगच्या या अलिशान घराचे नाव असून गोव्याच्या पर्यटन खात्याने या घरावरुन युवराजला दणका दिला आहे. त्यामुळे युवराजचे घर आता पुन्हा चर्चेत आले आहे.

(Indian all rounder Yuvraj Singh's luxury home in Goa has been issued a notice by the tourism department)

मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील मोरजी (Morjim, Goa) येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या 'कासा सिंग' या घराचा वापर युवराज व्यावसायिक कामासाठी करतो आहे. मात्र याचा व्यावसायिक कर भरणे अपेक्षित असताना तो भरला गेला नसल्याचं पर्यटन खात्याने म्हटले आहे.

याबाबत माहिती देताना पर्यटन खात्याने म्हटले आहे की, या घराचा वापर हा व्यावसायिक कामासाठी होत आहे. तशी नोंदणी करणे आवश्यक होते, मात्र नोंदणी झालेली नाही. त्यामुळे पर्यटन खात्याने युवराज सिंग याला नोटीस बजावली आहे. यावर 8 डिसेंबरला सुनावणी पार पडणार आहे. यासाठी युवराज सिंगला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे न्यायालय यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT