Goa Summer Dainik Gomantak
गोवा

Summer Temperature: महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांना इशारा! तापमान देणार तडाखा; वेधशाळेने काय सांगितला धोका? वाचा..

Goa Summer Temperature: यंदाच्या उन्हाळ्यातील (मार्च ते मे) तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा यांनी शनिवारी (ता. २८) जाहीर केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पुणे: यंदा उन्हाळ्यात (मार्च ते मे) कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश भागांत उन्हाचा चटका जोरात जाणवणार आहे. महाराष्ट्र, गोव्यासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिना सुसह्य राहण्याची शक्यता असून, मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा देखील कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

यंदाच्या उन्हाळ्यातील (मार्च ते मे) तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा यांनी शनिवारी (ता. २८) जाहीर केला. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्याच्या झळा वाढल्या. यातच देशाचे किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक होते.

१९०१ पासूनच्या नोंदीनुसार, सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदाचा फेब्रुवारी महिना तिसऱ्या क्रमांकावर होता. फेब्रुवारी महिन्यात देशात १४.७६ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली.

यापूर्वी २०२५ मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १५.०२ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली होती तर २०१६ मध्ये १४.९१ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली होती. यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. या कालावधीत किमान तापमान देखील सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. यंदा मार्च महिन्यात उष्ण लाटा कमी राहणार अाहेत.

तटस्थ ‘एल-निनो’ची शक्यता

विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सौम्य ‘ला-निना’ स्थिती सक्रिय आहे. मार्च ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये ही स्थिती निवळून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीवर येणार आहे. परिणामी मॉन्सून हंगामात तटस्थ ‘एल-निनो’ स्थिती राहण्याचे संकेत आहेत. मॉन्सून हंगामाच्या मध्यात ‘एल-निनो’ स्थिती तयार होण्याची शक्यता अधिक आहे. हिंद महासागरातील द्वी-ध्रुवीयता (इंडियन ओशन डायपोल - आयओडी) सध्या तटस्थ स्थितीत असून, पुढील हंगामात ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

मार्चमध्ये उष्ण लाटा कमी

महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत मार्च महिन्यात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहू शकते. परिणामी मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा सुसह्य राहण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात गुजरात व लगतच्या महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाच्या काही भागांत २ ते ५ दिवस उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रासह देशात उष्णतेच्या लाटा कमी राहणार आहेत. मार्च महिन्यात विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या दक्षिण भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे, तर उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT