Goa Weather: गोमंतकीयांनो काळजी घ्या! उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात; दुपारी घराबाहेर पडणे झाले अवघड

Temperature In Goa: राज्याच्या काही भागांत पहाटेच्या वेळी सौम्य थंडीचा अनुभव येत असला, तरी सकाळी दहा वाजल्यानंतर उष्म्याची तीव्रता झपाट्याने वाढत आहे.
Temperature In Goa
Temperature In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, हे तापमान सरासरीपेक्षा सुमारे २ अंश सेल्सिअसने अधिक आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे.

राज्याच्या काही भागांत पहाटेच्या वेळी सौम्य थंडीचा अनुभव येत असला, तरी सकाळी दहा वाजल्यानंतर उष्म्याची तीव्रता झपाट्याने वाढत आहे. दुपारच्या वेळेत सूर्यकिरण अधिक तीव्र होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होत आहे.

विशेषतः दुपारी रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

Temperature In Goa
Goa Weather: थंडीचा मुक्काम वाढला! गोव्यात किमान तापमानात मोठी घट, पहाटे अनुभवायला मिळतोय काश्मीरचा फील

या काळात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Temperature In Goa
Goa Weather Update: थंडी मंदावली, तापमान वाढले! गोव्यात पुढचे काही दिवस कसे राहील हवामान? वाचा वेधशाळेचा अहवाल..

दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे तसेच उन्हापासून संरक्षण करणारे उपाय करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com