India Meteorological Department
India Meteorological Department  Dainik Gomantak
गोवा

India Meteorological Department : मॉन्सूनसाठी आनंदाचा सांगावा ; तापमान निवळणार

गोमन्तक डिजिटल टीम

India Meteorological Department

पुणे, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव कमी होत आहे. एप्रिल ते जून या कालावधीत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य पातळीवर (न्यूट्रल) येण्याचे संकेत आहेत.

तर मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीपासूनच ‘ला निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता वाढली आहे. ही स्थिती मॉन्सूनच्या पावसासाठी पूरक मानली जाते.

अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अॅण्ड एटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) ‘एल निनो’ स्थितीचा अहवाल गुरुवारी (ता. ११) जाहीर केला.

या अहवालानुसार मार्च महिन्यात विषुववृत्तीय प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमानात कमी होत असल्याचे दिसून आले आहे. पूर्व प्रशांत महासागरात हे तापमान सर्वांत कमी झाले आहे.

एकत्रित महासागर वातावरणीय प्रणालीनुसार (कपल्ड ओशन अॅटमॉस्फेअर सिस्टिम) एल-निनो कमकुवत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

यातच आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या (आयआरआय) अहवालानुसार, उन्हाळा हंगामातच ‘एल-निनो’ स्थिती निवळून प्रशांत महासागरातील तापमान सर्वसाधारण स्थितीमध्ये संक्रमण होणार आहे. तसेच उन्हाळ्याच्या उत्तरार्धात ‘ला-निना’ स्थिती विकसित होणार आहे.

तापमान सामान्य :

एप्रिल ते जून या कालावधीत ‘एल-निनो’ स्थिती निवळून प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान त्याच्या सामान्य पातळीवर म्हणजेच न्यूट्रल (सरासरी तापमानाच्या ०.५ अंश सेल्सिअस कमी- अधिक ) येण्याची शक्यता ८५ टक्के आहे. तर जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘ला-निना’ स्थिती विकसित होण्याची शक्यता ६० टक्के अाहे.

...असा होतो मॉन्सूनवर परिणाम

विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सलग तीन महिने सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेल्यास त्या स्थितीला ‘एल निनो’; तर सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदले गेल्यास त्या स्थितीला ‘ला निना’ म्हटले जाते.

प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती सक्रिय असताना भारतात मॉन्सून काळात बहुतेक वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी होतो; तर ‘ला निना’च्या स्थिती दरम्यान बहुतेक वर्षी भारतात मॉन्सून काळात सर्वसाधारण किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो, असे दिसून आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition Case: राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली, युरी आलेमाव यांचा घणाघात

Betim Accident: बेती-वेरे येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच अंत

T20 World Cup: शानदार विजयानंतर हिट मॅनचं विजयी सेलिब्रेशन, मैदानात गाढला 'तिरंगा'; हार्दिकला दिली जादू की झप्पी

DGP Jaspal Singh : डीजीपींची खुर्ची अस्थिर, बिश्णोईंकडे देणार ताबा

Goa Weather Update : राज्यात पाऊस @ ३५ इंच; सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक

SCROLL FOR NEXT