India census first phase goa Dainik Gomantak
गोवा

Digital Census 2026: डिजिटल पद्धतीने जनगणना होणार सुरु! पहिला टप्‍पा 16 एप्रिलपासून; शिक्षकांना मिळणार 25 हजार मानधन

India census first phase goa: उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनगणनेचा पहिला टप्पा १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत पार पडणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: देशातील जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार असून, त्‍यात गोव्याचा समावेश आहे. या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षकांना २५ हजार रुपये तर पर्यवेक्षक म्हणून काम पाहणाऱ्या शिक्षकांना ३० हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे प्रलंबित राहिलेली ही जनगणना यंदा डिजिटल पद्धतीने राबवली जाणार आहे.

उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनगणनेचा पहिला टप्पा १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी शिक्षक स्वतःच्या मोबाईलचा वापर करणार आहेत. ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसेल, तेथे माहिती लिखित स्वरूपात नोंदवून पुढे प्रणालीत नोंद केली जाईल.

अचूक आणि वेगवान माहिती संकलनासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. जनगणना प्रक्रियेसाठी ‘मास्टर ट्रेनर्स’चे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. उत्तर गोव्यासाठी २२ तर दक्षिण गोव्यासाठी २८ मास्टर ट्रेनर्स नियुक्त करण्यात आले असून ते पुढील टप्प्यात शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत, असेही यादव यांनी नमूद केले.

दरम्यान, या कामासाठी अध्यापनाचा ताण कमी असलेले किंवा सुट्टीवर असलेले शिक्षक प्राधान्याने नियुक्त केले जातील.

जनगणनेबाबत महत्त्वपूर्ण माहिती

१६ एप्रिल ते १५ मेदरम्यान पहिला टप्पा

डिजिटल पद्धतीने जनगणना प्रक्रिया

नेटवर्क नसल्यास लिखित नोंद पद्धत

ग्रामीण भाग : मामलेदारांकडे जबाबदारी

शहरी भाग : उपजिल्हाधिकाऱ्यांकडे कामकाज

उत्तर गोवा : २२ मास्टर ट्रेनर्स

दक्षिण गोवा : २८ मास्टर ट्रेनर्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT