India Bike Week venue Dainik Gomantak
गोवा

सनबर्नचा कित्ता की निवडणुकीचा परिणाम? IBWचा गोव्याला राम-राम; महाराष्ट्रातील 'या' ठिकाणाला दिली पसंती

IBW 2025 Panchgani: आयोजकांनी १२ व्या आवृत्तीसाठी गोव्याला अचानक फाटा दिला असून, हा कार्यक्रम आता १९-२० डिसेंबर रोजी पाचगणी येथे आयोजित करण्याची घोषणा

Akshata Chhatre

IBW cancelled in Goa: गोव्यातील पर्यटन आणि लाईफस्टाईल इव्हेंट्ससाठी सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा 'इंडिया बाईक वीक' (IBW) यंदा गोव्यात होणार नाही. आयोजकांनी १२ व्या आवृत्तीसाठी गोव्याला अचानक फाटा दिला असून, हा कार्यक्रम आता १९-२० डिसेंबर रोजी पाचगणी येथे आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

हा सोहळा पूर्वी १२-१३ डिसेंबर रोजी गोव्यातील व्हागातोर येथे नियोजित होता. पण, राज्यात जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्याने सुरुवातीला त्याची तारीख बदलून १९-२० डिसेंबर करण्यात आली होती. मात्र, आता आयोजकांनी केवळ तारीखच नव्हे, तर ठिकाणही बदलल्याने गोव्याच्या पर्यटन आणि इव्हेंट वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

'सनबर्न'चा कित्ता की निवडणुकीचा परिणाम?

IBW ने अचानक गोवा सोडल्यामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात अनेक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. या स्थलांतरामागे केवळ जि. प. निवडणुकीच्या तारखांमधील बदल हे तात्पुरते कारण आहे की, 'सनबर्न' महोत्सवाने काही वर्षांपूर्वी गोव्यातून स्थलांतर केले होते, तसाच IBW देखील कायमस्वरूपी गोव्यातून बाहेर पडत आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

'सनबर्न' हा एक प्रमुख संगीत महोत्सवही काही वर्षांपूर्वी गोव्यातून हलवण्यात आला होता. आता IBW गोव्यातून बाहेर पडल्यामुळे, मोठे सांस्कृतिक आणि लाईफस्टाईल इव्हेंट्स आयोजित करण्यासाठी गोवा पूर्वीप्रमाणे 'प्रीमियर डेस्टिनेशन' म्हणून आपली ओळख गमावत आहे का, अशी तीव्र चिंता पर्यटन उद्योगातील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT