India Bike Week Dainik Gomantak
गोवा

India Bike Week: गोव्यात शुक्रवारपासून आशिया खंडातील सर्वात मोठा इंडिया बाईक विक

आवश्यक परवानगीला विलंब झाल्यानंतर अखेर उद्यापासून हा इव्हेंट होत आहे.

Pramod Yadav

India Bike Week 2022: आशिया खंडातील सर्वात मोठा बाईक शो अशी ओळख असलेला इंडिया बाईक विक 2022 शुक्रवारपासून (02 डिसेंबर) गोव्यात सुरू होत आहे. वागातोर येथे 02 व 03 डिसेंबर रोजी हा बाईक इव्हेंट होईल. आवश्यक परवानगीला विलंब झाल्यानंतर अखेर उद्यापासून हा इव्हेंट होत आहे.

(India Bike Week 2022 set to begin on 2 December in Goa)

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया बाईक विक 2022 ची ही आठवी आवृत्ती आहे. यावेळी या इव्हेंटसाठी जवळपास 14 हजार नोंदणी प्राप्त झाल्या आहेत. इव्हेंटसाठी सुरूवातीला परवानगी मिळत नव्हती, त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये यासाठी एक समिती नेमण्यात आली. अखेर 02 डिसेंबरपासून याला सुरूवात होत आहे. यासाठी IBW ने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत.

इंडिया बाईक विक (IBW 2022) या दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केले जातात. पाच विविध रेस ट्रॅक, बाइकर्स मार्ट (इनडोअर आणि आउटडोअर एक्स्पो), बिग ट्रिप सेशन्स, लडाख टेन्ट, तीन टप्पे आणि क्लब व्हिलेज यांसारख्या अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो.

बीएआर अकादमीचा विशाख डोंगराळ पायवाटेसाठी 1 तासाचे विशेष एन्ड्युरो सत्र आयोजित करणार आहे. तर Nelly, ProDirt Adventure, Motofarm आणि FMAE Motopark साठी प्रशिक्षण देईल. Moto Cross आणि डर्ट डॅशसाठी Adventure Track, Flow Track प्रशिक्षण आयोजित करणार आहेत. अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, म्हापसा येथे नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेली मोटोरेस वादग्रस्त ठरली होती. यामध्ये गोव्यातील एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT