India Alliance Leaders  Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election 2024: ''राज्यात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात सावंत सरकार फेल ठरलं''; इंडिया आघाडीचा घणाघात

Manish Jadhav

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीची राज्यात जय्यत तयारी सुरु आहे. राज्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे, विरोधक भाजपला दोन्ही जागांवर पटकणी देण्यासाठी आपली ताकद लावत आहे. दरम्यान, विरोधकांकडून अनेक प्रलंबित मुद्दे उपस्थित केले जात आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दरम्यान, राज्यातील आरोग्य सेवा कोलमडल्याचा घणाघात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी केला. त्यामुळे लोकांनी मतदान करण्यापूर्वी दोनदा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. इंडिया आघाडी गोव्याच्या प्रवक्त्या मनीषा उसगावकर (काँग्रेस), ॲड अश्मा बी (गोवा फॉरवर्ड) आणि सिसिल रॉड्रिगीस (आप) यांनी काँग्रेस हाऊस मध्ये संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्या ॲड अश्मा म्हणाल्या की, ''भाजप सरकार आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे. भाजप सरकार फातोर्डा येथील जिल्हा रुग्णालयाची बढाई मारते, परंतु या रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव आहे.''

त्या पुढे म्हणाल्या की, “हे रुग्णालय रुग्णांसाठी अटेंडन्स रुमसारखे झाले आहे. सुविधांच्या अभावांमुळे त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात येते. आयसीयू पूर्णपणे कार्यान्वित करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्याचबरोबर रुग्णालयात कर्मचाऱ्यांचीही वणवा आहे. आम्हाला मूलभूत सेवा व्यवस्थित मिळत नाहीत. आरोग्य क्षेत्रात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.”

त्यानंतर मनीषा उसगावकर यांनीही राज्यातील भाजप सरकारला धारेवर धरले. उसगावकर म्हणाल्या की, ''भाजप सरकारने सुविधा देण्यापेक्षा भ्रष्टाचारावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडेच आरोग्य विभागात हाऊसकीपिंग घोटाळा झाला, ज्यामध्ये सर्वात कमी बोली लावणाऱ्याला भाजपाच्याच नेत्याला अपात्र ठरवून सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे राज्याचे मोठे नुकसान होणार आहे. जेव्हा सर्वात कमी बोली लावणाऱ्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले, तेव्हाही सरकारने भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.”

“यापूर्वी, राज्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही आरोग्य विभागातील घोटाळा उघडकीस आणला होता. पण घोटाळे करणारे सत्तेत असल्यामुळे कारवाई होत नाही,” असेही त्या पुढे म्हणाल्या.

उसगावर यांच्यानंतर सिसिल रॉड्रिगीस यांनी सावंत सरकारवर तोफ डागली. रॉड्रिगीस म्हणाल्या की, ''फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्येही कर्मचारी नसल्याने दयनीय अवस्था आहे. तिथे कोणतेही सर्जन नाहीत आणि लिफ्टही काम करत नाहीत. याही रुग्णालयात सुविधांचा अभाव आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, "उपजिल्हा रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी ठरल्याने, अपघाताची प्रकरणे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवली जातात. कोरोना महामारीच्या काळात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. त्यांच्या या अपयशामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून विश्वजित राणे अशा घटनांची जबाबदारी घेत नाहीत.'' 'जे नेते लोकांचे कल्याण करु शकत नाहीत त्यांना बिलकुल निवडून देऊ नका. इंडिया आघाडीला मतदान करा,' असे आवाहन रॉड्रिगीस यांनी शेवटी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT