Independent candidate from Panaji constituency likely to get support from MGP-TMC for goa election  Dainik Gomantak
गोवा

पणजी मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला मगो-तृणमूल कडून पाठिंबा मिळण्याची शक्यता

सुदिन ढवळीकर : भारतीय जनता पक्षाला पाठिंबा नाहीच; युतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा 10 दिवसांत येणार समोर

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला बहुमताची गरज भासल्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठिंबा मगोकडून दिला जाणार नाही. मगो पक्ष भाजपविरोधात आहे. आगामी सरकार हे मगो - तृणमूल काँग्रेस युतीचे असेल हे निश्‍चित आहे. येत्या 10 दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा युतीचा उमेदवारावर निर्णय होईल. पणजी मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय येत्या 2 दिवसांत युतीचे नेते चर्चा करून घेतील अशी माहिती मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (Independent candidate from Panaji constituency likely to get support from MGP-TMC for goa election)

विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय नेते प्रचारात अनेक आश्‍वासने देतील मात्र या आश्‍वासनांना जनतेने भुलून जाऊ नये. गेली दहा वर्षे राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असतानाही तो त्यांना का सुरू करता आला नाही असा प्रश्‍न मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी केला. या सरकारला खाण व्यवसाय सुरू करायचा नाही व भाजप सरकार पुन्हे सत्तेवर आल्यास तो आणखी दहा वर्षे तरी शक्य नाही अशी टीका त्यांनी केली.

समृद्धीचा अर्थ

राज्याच्या विकासावर बोलताना वाहतूक खात्याचा महसूल मी वाहतूक मंत्री असताना ४१० कोटींवर नेला होता तो आता 270 कोटींवर खाली कसा आला याचे स्पष्टीकरण करावे.

पंचायत सचिव पदासाठी लाखोंची बोली लावण्यात आली त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. माजी बांधकाममंत्र्यांना नोकरभरती घोटाळ्यावरून पदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मुख्यमंत्र्यांनी इतर मतदारसंघावर न बोलता स्वतःच्या मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती द्यावी. भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास समृद्धीची वाट नव्हे, तर भ्रष्टाचाराची वाट पुन्हा अवलंबतील. त्यांना समृद्धीचा अर्थ कळत नाही, तोपर्यंत राज्यात समृद्धी होणे अशक्य आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मडकईत प्रचाराची गरज नाही

मगो व तृणमूल काँग्रेसची (Goa TMC) युती असून 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांपैकी 13 उमेदवार मगोचे तर 26 तृणमूलचे आहेत. मला मडकईत प्रचाराची आवश्‍यकता भासत नाही. प्रत्येकवेळी माझी मते वाढतच आहेत. मगो व तृणमूल काँग्रेस युतीचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळी मी आजारामुळे उपस्थित राहिलो नव्हतो, मात्र भाजपने त्याचे भांडवल केले. मुख्यमंत्री हे स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळे लसीकरणाचा डोस घेतल्यावर ताप किंवा सर्दी होऊ शकते ती मला झाली त्यामुळे त्यांच्याकडून माझ्या गैरहजेरीबाबत त्यांनी केलेली टीका ही अपेक्षित नव्हती. त्यांच्या या वक्तव्याचा मगो पक्ष निषेध करत आहे असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

खाणबंदीचे कारण स्पष्ट करा

काल गोव्यातील जनतेशी संवाद साधताना तसेच सभेत केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी लोकांना राज्यातील खाण (Goa Mining) व्यवसाय लवकरच सुरू केला जाईल असे आश्‍वासन दिले आहे, मात्र 2012 मध्ये खाणी बंद करण्यामागील कारण भाजपने स्पष्ट करावे. ‘डम्प’च्या नावाने हा खाण व्यवसाय सुरू करणार असल्याचे सांगितले जात असले तरी कायदेशीर खनिज उत्खनन व्यवसाय आणखी दहा वर्षे तरी सुरू होणे शक्य नाही. अमित शहा यांनी सावर्डे मतदारसंघात घरोघर प्रचारात भाग घेतला. खाणपट्टा असलेल्या या मतदारसंघात मगोचा प्रबळ उमेदवार आहे. ज्या उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली आहे त्याचे नाव एसआयटीच्या चौकशीत गोवले गेले आहे, असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI: रोहित शर्मासाठी वेलिंग्टन 'डेंजर झोन', खराब रेकॉर्ड चिंतेचा विषय; दुसऱ्या वनडेत इतिहास बदलण्याचे आव्हान

Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

SCROLL FOR NEXT