आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या विजयावर केला शिक्कामोर्तब

टीकेपूर्वी उमेदवाराची चाचपणी करावी, काँग्रेसचा विरोधकांना टोला
Goa AAP statement on Congress
Goa AAP statement on CongressDainik Gomantak

पणजी: काँग्रसचे पक्षाचे उमेदवार जिंकून आल्यावर पूर्वीप्रमाणे भाजपमध्ये जातील, असे विधान करून आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे किती उमेदवार त्यांच्या पक्षामध्ये आहेत. त्याची चाचपणी करावी व त्यानंतर टीका करावी, असा टोला गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे मिडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी आज हाणला. (Goa AAP statement on Congress)

Goa AAP statement on Congress
भाजपकडून खाण अवलंबितांना खोटी आश्‍वासने: पालेकर

पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला यावेळी दिल्ली काँग्रेसचे उपाध्यक्ष अली मेहेंदी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर, अखिलेश यादव, साईश आरोसकर या वेळी उपस्थित होते. पुढे बोलताना पणजीकर म्हणाले, गोव्यात काँग्रेस (Goa Congress) सरकार स्थापन करणार हे निश्‍चित आहे. निवडणुकीत ‘आप’चा एकही उमेदवार जिंकणार नाही. चर्चिल आलेमांव हे काँग्रेसचे नसून ते तृणमूल काँग्रेसचे (Goa TMC) आहेत, याची सुद्धा जाणीव आपच्या नेत्यांना नावेलीतील काँग्रेस उमेदवार आवेर्तान फुर्तादो, कुडतरीचे मोरेनो रेबेलो, कळंगुटचे मायकल लोबो, वास्कोचे कार्लूस आल्मेदा हे पूर्वी भाजपशी संबंधित होते आणि निवडून आल्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये (Goa BJP) जाणार असे आतिशी बोलत आहेत. तसेच कुंकळ्ळी आणि हळदोणे येथून सुद्धा काँग्रेसचे उमेदवार जिंकणार असे ती मान्य करत आहे, यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असे पणजीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com