Stray Dogs Attack in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या समस्येत वाढ; पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांनी सांगितले यामागील कारण

Stray Dogs Attack: भटक्या कुत्र्यांचे हल्ले टाळण्यासाठी त्यांची पैदास रोखणे गरजेचे असल्याचे मत पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांनी व्यक्त केले आहे. या घट

दैनिक गोमन्तक

Stray Dogs Attack: राज्यभरात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटना मागील काही दिवसात खूप वाढल्याचे दिसून येत आहे. गोव्यात ठिकठिकाणी अशा अनेक घटना नागरिकांसोबत आणि पर्यटकांसोबतही घडल्या आहेत. याबाबत सरकारने योग्य पावले उचलण्याची सर्वस्तरातून मागणी होत आहे.

भटक्या कुत्र्यांचे हल्ले टाळण्यासाठी त्यांची पैदास रोखणे गरजेचे असल्याचे मत पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांनी व्यक्त केले आहे. या घटना टाळण्यासाठी सरकारतर्फे प्राणी जन्म नियंत्रण (ABC) उपक्रम राबवण्यात येतो.

दुर्दैवाने, समस्या नेमकी तिथेच आहे. ABC कार्यक्रम पार पाडण्यात गुंतलेल्या प्राणी कल्याण संस्थांना त्यांची बिले वेळेत भरली जात नाहीत, ज्यामुळे त्यांना पुरेसा निधी मिळायला विलंब होत असल्याने या कामालाही उशीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

जर जयपूर आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये उत्कृष्ट ABC कार्यक्रम असू शकतो, तर गोव्यात का नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ABC कार्यक्रमाच्या अपयशामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या गोव्यात वाढली आहे. परिणामी भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे शहरी विरुद्ध ग्रामीण वादाला खतपाणी मिळाले असून लोक या समस्येसाठी सरकारला दोष देत आहेत.

पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक आणि प्राणी कल्याण कार्यांशी संबंधित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात हा धोका जास्त आहे. पशुवैद्यकीय सर्जन डॉ. जयराम देसाई म्हणाले, शहरी भागात राहणाऱ्या लोकांना भटक्या कुत्र्यांच्या वर्तनाबद्दल अधिक माहिती नसल्याने त्यांच्यासोबत हे हल्ले जास्त घडताना दिसत आहेत.

भटके कुत्रे आता जागोजागी असून कधीही, कुणावरही हल्ला करू शकतात. त्यामुळे ही चिंतेची बाब बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT