Santa Cruz Electricity Issue: सांताक्रुझमध्ये विजेचा लंपडाव नित्याचा

मनुष्यबळाची उणीव : वीज कार्यालयाकडे दुरुस्तीसाठी एकच वाहन
Electricity Issue
Electricity IssueGomantak Digital Team

Santa Cruz Electricity Issue: गेल्या महिन्यापासून सांताक्रुझ परिसरात दिवसरात्र विजेचा लपंडाव सुरू आहे. ही विजेची समस्या गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहेत.

या परिसरात असलेली जुनी उपकरणे त्याला कारणीभूत असतानाही वीज खात्याकडून तक्रारी देऊनही दुर्लक्ष होत आहे.

बांबोळी येथील वीज उपकेंद्रात रात्री अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुमारे २ ते ३ तास पूर्ववत केला जात नाही.

या भागात एकच वीज केंद्राचे वाहन आहे, त्यामुळे एकाचवेळी दोन वा तीन ठिकाणी वीज खंडित झाल्यास ती दुरुस्तीची लोकांना वाट पाहावी लागत असल्याने वीजग्राहक संतापले आहेत.

सांताक्रुझ मतदारसंघात गेली अनेक वर्षे वीज व पाण्याच्या समस्येकडे कधीच पाहिले गेलेले नाही. त्यामुळे लोकांना नेहमीच विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागते तसेच या परिसरात पाण्यासाठी विहीरी तसेच पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागते.

Electricity Issue
International Day of Families: आज 'जागतिक कुटुंब दिन'; जाणून घ्या कुटुंबाचं महत्त्व अन् उद्देश

बांबोळी येथे वीज उपकेंद्र आहे, मात्र सांताक्रुझ व सांत आंद्रे मतदारसंघाचा भार त्या केंद्रावर आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी वीज दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकी एकच वाहन आहे.

त्यामुळे वीज खात्याच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. त्या तक्रारीचे काय झाले, असे विचारल्यास तुमची तक्रार संबंधितांकडे पाठवली आहे, असे वारंवार सांगण्यात आले आहे.

Electricity Issue
Bafta Awards 2023 : आय एम रुथ ने सिंगल ड्रामासाठी मारली बाजी...जाणुन घ्या विजेत्यांची नावं

त्यामुळे तक्रारींना का आणि कशामुळे विलंब होतो, याची माहितीही मिळत नाही. बांबोळी वीज उपकेंद्राचे सहाय्यक अभियंत्यांना त्यांच्याकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाची माहिती आहे मात्र त्यासाठी त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांची मागणी केली जात नाही अशी माहिती वीज दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता उघडकीस आले.

Electricity Issue
ऑपरेशन समुद्रगुप्त! एका वर्षात 40 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; ISI, अंडरवर्ल्ड कनेक्शनही आले समोर

वीजमंत्र्यांची आश्‍वासने; कार्यवाही नाही

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी जुनी उपकरणे बदलून त्या जागी नवीन उपकरणे घालण्यात येतील तसेच ज्या ठिकाणी अधिक क्षमता असलेल्या ट्रान्स्फॉर्मरची गरज आहे, तेथे ते बसवण्यात येतील, अशी आश्‍वासने विधानसभेत स्थानिक आमदार रुदॉल्फ फर्नांडिस यांनी उपस्थित केलेल्या वीज समस्येच्या प्रश्‍नावर दिली होती. मात्र, त्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही.

Electricity Issue
Belgaum Flights: गोव्यात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध; बेळगावला सुरू होतेय थेट विमानसेवा

...तर पावसाळ्यात काळोखात बसावे लागेल !

वीज दुरुस्तीच्या कामासाठी एकच वाहन आहे त्यामुळे एखाद्या ठिकाणी काम करताना अधिक वेळ लागला तर इतर कॉल्सला उशीर होतो. त्यामुळे अनेकदा लोक संतप्त होऊन कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करतात. अधिकारी लोक कार्यालयात असतात.

मात्र, कर्मचाऱ्यांना लोकांना सामोरे जावे लागते. आता पावसाळा जवळ येत असल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार हे वाढणार आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये वाढ होण्याची गरज आहे.

एकच वाहन असल्यास लोकांना पावसाळ्यामध्ये काळोखात बसण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे वीज खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com