Goa Corona Updates  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: देशात H3N2 रूग्ण वाढत असताना राज्यात गेल्या 24 तासात 'इतक्या' कोरोनारूग्णांची भर...

सक्रिय रूग्णसंख्या अर्धशतकाजवळ

Akshay Nirmale

Goa Corona Update: एकीकडे देशात H3N2 विषाणुचे रूग्ण वाढत चालले असताना आता कोरोना देखील डोके वर काढू लागला आहे. गोव्यात हळूहळू कोरोना रूग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

राज्यात गेल्या २४ तासात तब्बल 11 नवे कोरोनारूग्ण आढळून आले आहे. विशेष म्हणजे, पाच दिवसांपुर्वीच म्हणजे 10 मार्च रोजी गोव्यात 24 तासात कोरोनाचे नवीन 8 रूग्ण आढळून आले होते.

गोव्यात नव्याने आढळलेल्या या 11 नव्या रूग्णांमुळे राज्यातील सक्रिय कोरोनारूग्णसंख्या आता 48 वर गेली आहे. या नव्या 11 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात 3 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

गोव्यात गेल्या 24 तासात 312 नव्या चाचण्या झाल्या आहेत. तर कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गोव्याचा कोरोनामुक्ती दर 98.43 टक्के इतका आहे.

गोव्यात आत्तापर्यंत 21 लाख 53 हजार 727 एकुण चाचण्या झाल्या आहेत. एकुण 2 लाख 59 हजार 210 रूग्ण आढळून आले होते, त्यातील 2 लाख 55 हजार 149 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4013 कोरोनारूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT