Goa contract workers  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोविड काळातील 'कंत्राटी' कर्मचाऱ्यांच्या सेवेत वाढ

कर्मचाऱ्यांना भविष्यात इस्पितळात नोकरी मिळण्याची आशा

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात कोविड महामारीच्या काळात कंत्राटी पद्धतीवर सेवेत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी एक वर्ष वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यावेळी खात्यामध्ये रिक्त जागा उपलब्ध होतील, तेव्हा या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने या कर्मचाऱ्यांना त्यांनी दिलेल्या सेवेमुळे भविष्यात इस्पितळात नोकरी मिळण्याची आशा दिसू लागली आहे.

कोविड महामारीच्या काळात राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातल्यानंतर इस्पितळातील असलेला कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्याने सरकारने कंत्राटी पद्धतीवर विविध पदांसाठी नियुक्ती केल्या होत्या. त्यांच्या नियुक्तीची मुदत येत्या काही दिवसांत संपत आहे. त्यामुळे सरकारने त्यात मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सेवा केली आहे त्यांना ते लागू असेल. यामध्ये स्टाफ नर्सेस, टेक्निशियन्स व मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस) यांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांनी कोविड काळात जिवाची पर्वा न करता सेवा दिली. त्यामुळे त्यांचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केल्याचे गोवा माहिती व प्रसिद्धी खात्याने पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT