'हरवळे धबधब्यातील पर्यटकाच्या मृत्यूला जीवरक्षक जबाबदार नाही'

मानवी हक्क आयोगाच्या चौकशी अहवालात उघड
Harvalem Waterfall
Harvalem Waterfall Dainik Gomanatak
Published on
Updated on

पणजी: हरवळे धबधबा येथे हर्ष राजेश कुमार याचा बुडून मृत्यू झाला होता व त्याला जीवरक्षकाकडून झालेला निष्काळजीपणा जबाबदार असल्याची तक्रार त्याचा भाऊ राहुल कुमार याने मानवी हक्क आयोगाकडे केली होती. याप्रकरणाच्या चौकशी अहवालानंतर आरोपात काहीच तथ्य नसून समज देऊनही तो पाण्यात उतरला व बुडून मरण पावल्याचे त्यात नमूद केले आहे. आयोगासमोर सुरू असलेली चौकशी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.

Harvalem Waterfall
गोव्याचे पर्यटन 'पथदर्शी' आराखड्यासाठी प्रयत्न

हर्ष कुमार व त्याचे इतर मित्र हे गोवा फिरण्यासाठी आले होते. हरवळे धबधब्याच्या पाण्यात ते सर्वजण उतरले होते. धबधब्यात पाणी खोल असल्याची समज तेथे आलेल्या पर्यटकांना देण्यात आली होती व जीवरक्षकही तेथे उपस्थित होते. हर्ष कुमार याला खोल पाण्यात न जाण्याची सूचना देऊनही तो खोल पाण्यात गेला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूला जीवरक्षक किंवा तेथील सुरक्षारक्षक जबाबदार नसून तो स्वतःच जबाबदार असल्याचा निष्कर्ष चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. राहुल कुमार याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ही चौकशी करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant Inquiry Order
goa crime branch busts two fake call centers
Goa Mandovi River Casino Dispute
Goa Karnataka Border Conflict 2026:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com