Vegetables in Panaji Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Sales : श्रावणामुळे गोव्यात भाजीपाल्याच्या विक्रीमध्ये वाढ

श्रावण असल्यामुळे गोव्यातील फलोत्पादन दुकानांमध्ये हिरव्या भाज्यांची झपाट्याने विक्री होत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : श्रावण असल्यामुळे गोव्यातील भाजी दुकानांमध्ये हिरव्या भाज्यांची झपाट्याने विक्री होत आहे. दररोज 80 टन भाज्यांच्या विक्रीच्या तुलनेत, गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन लिमिटेड (GSHCL) च्या आउटलेटमध्ये दिवसाला 100 ते 110 टन हिरव्या भाज्यांची विक्री होत आहे.

(Increase in sales of vegetables in Goa due to Shravana)

GSHCL चे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई म्हणाले की, “सणासुदीच्या हंगामामुळे खरेदीदार नेहमीपेक्षा जास्त भाज्यांची खरेदी करत असल्याने दररोज 20-25 टन विक्रीत वाढ झाली आहे.

गोव्यातील हिंदू सहसा श्रावण महिन्यात शाकाहारी आहार घेतात. अनुदानित दरात मिळणारे टोमॅटो आणि कांदे या दुकानांवर उर्वरित भाज्यांच्या तुलनेत वेगाने विकले जात आहेत. महिन्याची सांगता गणेश चतुर्थीच्या उत्सवाने होणार असून भाजी खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

“प्रत्येक दिवसाची ऑर्डर एक दिवस आधी दिली जाते आणि त्यानुसार पुरवठादार आम्हाला भाज्या पाठवतात. त्यामुळे वाढीव प्रमाणात हिरव्या भाज्या घेण्यास कोणताही अडथळा नाही. यापैकी जास्त करून भाजीपाला बेळगावहून येतो आणि आमचे पुरवठादार मागणीनुसार पुरवठा करण्यास सक्षम आहेत.

पुरवठादारांना मागणी पूर्ण होण्यासाठी हवामानही अनुकूल आहे. काही विक्रेते प्रामुख्याने स्थानिक उत्पादकांकडून भाजीपाला घेतात ज्यामुळे हिरव्या भाज्या ताज्यातवान्या मिळतात.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT