Petrol Diesel Price in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांत वाढ; जाणून घ्या आजचे इंधनाचे दर

पेट्रोलियम उत्पादनांच्या जागतिक दरांचा देशांतर्गत दरांवर होतो परिणाम

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या किंमतींमध्ये सोमवारी वाढ झाली. पणजी आणि उत्तर गोव्यातील वाढ किरकोळ असून दक्षिण गोव्यातील वाढ मोठी आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी 17 एप्रिल रोजी पणजी आणि उत्तर गोवा येथे पेट्रोल दरांमध्ये प्रतीलीटर 9 पैशांची वाढ झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरात प्रतीलीटर 57 पैशांची वाढ झाली.

उत्तर गोवा आणि पणजीतील डीझेल दरांमध्ये प्रतीलीटर 10 पैशांची वाढ झाली तर दक्षिण गोव्यातील डीझेल दरामध्ये प्रतीलीटर 55 पैशांची वाढ झाली.

जागतिक स्तरावरील क्रुड ऑईलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांवरून तेलकंपन्या दररोज पेट्रोल-डीझेल या इंधन दरांत बदल करतात. त्यामुळे दररोज या इंधन दरांमध्ये चढ उतार होत असतात.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.82

Panjim ₹ 97.82

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.39

Panjim ₹ 90.39

South Goa ₹ 90.23

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

Breast Cancer Screening: 2.15 लाख महिलांची तपासणी, 3,925 जणींमध्ये संशयित लक्षणे! गोव्यात 96 महिलांना स्तन कर्करोगाचे निदान

SCROLL FOR NEXT