Amit Shah In Goa: 'फक्त दक्षिण गोवा जागेसाठी येथे आलोय,' फर्मागुडीतून शहांची प्रचार तोफ धडाडली

गोवा देशाच्या माथ्यावरील बिंदी आहे.
Amit Shah In Goa
Amit Shah In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Amit Shah In Goa: दक्षिण गोवा लोकसभा मतदार संघाची जागा 2024 ला जिंकायचीच या निर्धाराने आज गृहमंत्री अमित शहा यांनी फर्मागुडी येथे उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. 'मी केवळ दक्षिण गोव्यासाठी येथे आलोय,' असे शहांनी यावेळी आवर्जुन सांगितले आणि जनतेला 2024 दोन्ही जागा भाजला जिंकून देण्याचे आवाहन केले.

शहांनी प्रमोद सावंत यांनी त्याच्या कार्यकाळाची चार वर्षे पूर्ण केल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, मनोहर पर्रिकर यांचे योगदान देखील गोवा आणि देश कधीही विसरणार नाही असे शहा म्हणाले.

"राहूल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा केली. यात्रा संपल्यानंतर राहूल गांधी प्रचारासाठी गेले पण त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय येथे भाजप सत्तेत आला असून, काँग्रेसचा तेथे सूपडासाफ झाला. गोवा, उत्तराखंड आणि पूर्वोत्तर राज्यात जेव्हा भाजप जिंकले तेव्हा खर्गे यांनी ती छोटी राज्य असल्याची वक्तव्य केले. पण आम्ही छोट्या राज्यांना देखील देशाचे महत्वपूर्ण अंग मानतो. गोवा देशाच्या माथ्यावरील बिंदी आहे." असे शहा म्हणाले.

"मी आज फक्त आणि फक्त दक्षिण गोवा लोकसभा जागेसाठी आलो आहे. 2024 मध्ये दक्षिण गोव्यात भाजप खासदार असेल असा मला भाजपच्या कार्यकर्त्यांनी विश्वास दिला आहे. दहा वर्षांपासून राज्यातील खाणीचा मुद्दा अडकून पडला होता. पण मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि आमच्या नेत्यांनी खाणीचा मुद्दा एका वर्षात सोडवला. मी गोवा सरकारला स्वयंपूर्ण गोवासाठी देखील शुभेच्छा देतो. हर घर जल, दिव्यांगाना मदत आणि अशा अनेक सुविधा घरपोच पुरवल्या जात आहेत. आमच्या एकाही सरकाने असे काम केले नाही असे काम मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे."

Amit Shah In Goa
Pramod Sawant: टोपी, कार्ड, कर्नाटक आणि 'भिवपाची गरज ना', अमित शहांच्या समोर काय बोलले प्रमोद सावंत

अमित शहांनी यावेळी राज्याने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे देखील कौतुक केले. सीएए कायदा आला, राम मंदीराचे निर्माण होत आहे, काशी विश्वनाथ कॉरीडोर होत आहे, वंदे भारत, एम्स, आयआयटी, आयआयएम, विमानतळे, हर घर जल, पीएम आवास अशा अनेक योजना नरेंद्र मोदींनी राबविल्या आणि यशस्वी करून दाखवल्याचे उद्गार शहांनी काढले.

"मोदींनी गोव्याला 432 वरून दरवर्षी 3000 कोरोड रूपये देण्यास सुरूवात केली. अटल सेतू, झुआरी पूल, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, पर्रिकर यांच्या नावाने बायपास देखील मोदी सरकारनेच केला." अशी माहिती यावेळी अमित शहांनी दिली. "दक्षिण गोव्यात कर्करोग रूग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, आयआयटी, फॉरेन्सिक, कायदे विद्यालय अशी विकास कामे केली जात आहेत. गेल्या वर्षी आपले प्रयत्न कमी पडले, पण 2024 ला गोव्यात अर्धे अर्धे चालणार नाही, दोन्ही जागा भाजपलाच मिळाल्या हव्यात." असे शहा यावेळी म्हणाले.

Amit Shah In Goa
Amit Shah In Goa: अमित शहांची सभा! बाणस्तरी येथे पाटकर यांच्यासह काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात

यापूर्वी बोलताना खासदार श्रीपाद नाईक यांनी दक्षिण गोवा लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवला. आगामी 2024 च्या निवडणुकीत मागील काळातील कमतरता भरून काढत राज्यातील दोन्ही भाजपच्याच निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन नाईक यांनी केले.

"1999 पासून ज्यापद्धतीने आपण उत्तर गोव्यात भाजपचा खासदार आहे. त्याच पद्धतीने दक्षिण गोव्यात देखील भाजपचा उमेदवार निवडून द्यायचा आहे. दक्षिणेच्या लोकांनी काँग्रेसच्या सार्दिन यांना निवडून दिले आणि मोठी चूक केली. सार्दिन लोकांना देखील भेटायला उपलब्ध नसतात." असा टोला यावेळी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी केला.

यावेळी व्यासपीठावर गोविंद गावडे, केदार नाईक, दिलायला लोबो, जोशुआ डिसोझा,दिव्या राणे, रुडॉल्फ फर्नांडिस, रोहन खंवटे, राजेश फळदेसाई, निळकंठ हळर्णकर, जेनिफर मोन्सेर्रात, बाबुश मोन्सेर्रात, बाबु आजगावकर, मंत्री निलेश काब्राल, सभापती रमेश तवडकर, मंत्री सुभाष फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, याशिवाय मगोचे जीत आरोलकर आणि सुदीन ढवळीकर आणि मोठ्या प्रमाणावर भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com