Increase in complaints of goa assembly election code of conduct violations in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी भाजप नेत्यांचा वाटा मोलाचा!

गोव्यात आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीत वाढ

दैनिक गोमन्तक

गोवा: विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने राज्यात आचारसंहिता लागू केली आहे. राज्यात राजकीय नेत्यांकडून निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन होताना दिसत आहे. कालच लोबो, जोशुआ यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच दोडा येथे निवडणूक आचारसंहिता आणि कोविड नियमांचे (COVID 19 Guidlines) उल्लंघन करत मोठ्या संख्येने समर्थकांना एकत्रित केल्याच्या आरोपावरून थिवीचे भाजप उमेदवार नीळकंठ हळर्णकर यांच्याविरोधात कोलवाळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. (Increase in complaints of goa assembly election code of conduct violations in Goa)

तसेच काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) भरारी पथकाने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघनकेल्या प्रकरणी तक्रार केली असून, पर्वरी पोलिसांनी भाजप उमेदवार रोहन खंवटे, काँग्रेस उमेदवार विकास प्रभुदेसाई, यांना सांगोल्डा येथे सभा आयोजित केल्याच्या आरोपाखाली तसेच साळगाव पोलिसांनी भाजप नेते दत्ता खोलकर व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

गोव्यात आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीत वाढ

राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत विद्रुपीकरण कायद्याखाली विविध भागातील सुमारे 28,413 फलक हटविण्यात आले आहेत. ‘सी व्हीजील’ या ॲपद्वारे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 329 तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यातील 219 प्रकरणी संबंधित तालुक्यातील निर्वाचन अधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. 9 तक्रारींबाबत गुन्हा नोंद झाला आहे. आतापर्यंत सुमारे 2.44 कोटींची दारू, ड्रग्ज, रोख रक्कम तसेच वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कुणाल यांनी दिली

कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या

राज्यात निवडणूक आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाल्यापासून आतापर्यंत विद्रुपीकरण कायद्याखाली विविध भागातील सुमारे 28,413 फलक हटविण्यात आले आहेत. ‘सी व्हीजील’ या ॲपद्वारे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 329 तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यातील 219 प्रकरणी संबंधित तालुक्यातील निर्वाचन अधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. 9 तक्रारींबाबत गुन्हा नोंद झाला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT