वास्को : वास्को (Vasco) शहर आणि परिसरात डेंग्यूच्या (Dengu) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे चिखली उपजिल्हा रुग्णालयात खाटांची कमतरता भासत आहे. रुग्णालयात रक्ताच्या चाचण्यांसाठी गर्दी असते. कधीकधी काही रुग्णांना रुग्णालयात खाटाही मिळत नाहीत. परिणामी काही डेंग्यूच्या रुग्णांना गोमेकॉ (GMCH) इस्पितळात पाठवले जाते. (Increase dengue patients in Vasco in Goa)
चिखली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि आरोग्य अधिकारी डॉ. अनिल उमरस्कर यांनी सांगितले की, रुग्णालयात दररोज 20 रुग्ण दाखल होतात. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आमच्याकडे दररोज सरासरी डेंग्यूचे 20 रुग्ण दाखल होतात.
गेल्या काही दिवसांमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना दाखल करण्यात आल्यामुळे खाटांची कमतरता निर्माण होते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ. अनिल उमरस्कर यांना भेटायला गेलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा म्हणाले की, अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. कारण काही ठिकाणी डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळतात. लोकांना खाटा मिळत नाहीत, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या.
11 दिवसांत 50 हजार चाचण्या
पणजी : राज्यात या महिन्यात 11 दिवसांत तब्बल 51,347 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. राज्यातील विविध सरकारी इस्पितळात कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे. आता दररोज सरासरी 4 ते 5 हजार चाचण्या होत आहेत. त्यातून शंभरेक नवे रुग्ण आढळून येत आहेत. 1 ते 11 ऑगस्ट दरम्यान 17 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.