Dabolim Airport
Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

कामगार सेनेच्या आंदोलनामुळे दाबोळी विमानतळावर प्रवाशांचे हाल

दैनिक गोमन्तक

पणजी: शिवसेनेच्या कामगार सेनेने काल दाबोळी विमानतळावर स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांसह आंदोलन केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. कांही विमान फेऱ्याही यामुळे रखडल्या होत्या. स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांशी असलेल्या करारावरून हे आंदोलन छेडण्यात आले होते. गोवा विमानतळावर स्पाइस जेटने आलेल्या प्रवाशांचे सामान 2 तासापासून अडकलेले होते.

दाबोळी येथील विमानतळावर शिनसेनेच्या कामगार सेनेचे सकाळी अचानक आगमन झाले. त्यांनी विमानताळाबाहेर कर्मचाऱ्यांसह निदर्शने करीत कर्मचाऱ्यातील करारात दलालीची गरज नाही, अशी मागणी करून तसे निवेदन स्पाईटजेटच्या अधिकाऱ्यांना दिले. या आंदोलनामुळे सकाळी बराच काळ प्रवाशांना विमानतळावर ताटकळत रहावे लागले. कर्मचाऱ्यांनी निदर्शने करीत स्पाईसजेटच्या प्रशासनाकचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. निवेदनाच्या प्रति कामगार खात्याचे आयुक्त आणि उद्योग खात्याच्या सचिवांना पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, आपल्या आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचारी आमच्या युनियनचे सदस्य आहेत. आम्‍हाला एकमेव सौदेबाजी एजंट म्‍हणून ओळखावे. इतर कोणत्याही पक्षामध्ये समझोता किंवा करार झाला असेल तर तो कर्मचारी आणि युनियनवर बंधनकारक असणार नाही. भारतीय कामगार सेनेचा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सामूहिक सौदेबाजीच्या तत्त्वांवर विश्वास आहे. औद्योगिक संबंध आणि औद्योगिक शांततेवर आमचा विश्वास आहे. भारतीय कामगार सेनेच्या घटनेनुसार, कामगार आणि भारतीय कामगार सेना यांच्यात झालेल्या सर्व समझोते आणि करारांवर उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि इतरांच्या स्वाक्षरीसह युनियनच्या अध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक आहे. आम्‍हाला आशा आहे, की कर्मचाऱ्यांच्या तक्रारी व मागण्या सोडवण्‍यासाठी व्‍यवस्‍थापन आम्‍हाला सहकार्य करील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT