मडगावातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर

व्यापारी राजधानी मडगावात वर्षभरापूर्वी दुरुस्त केलेल्या 23 सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील एक वगळता बाकी सर्व पुन्हा बंद पडले आहेत
Margao commercial capital of goa cctv cameras are closed
Margao commercial capital of goa cctv cameras are closedDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: व्यापारी राजधानीत (Margao Commercial Capital of Goa) वर्षभरापूर्वी दुरुस्त केलेल्या 23 सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील (CCTV cameras ) एक वगळता बाकी सर्व पुन्हा बंद पडले आहेत तर पालिकेच्या जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत नवे कॅमेरे बसविण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची अजून अंमलबजावणी न झाल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्था सध्या तरी वाऱ्यावर आहे.

पालिकेच्या 9 जुलैच्या बैठकीत मडगाव व फातोर्डात मोक्याच्या जागी हे कॅमेरे केवळ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसविण्याचा ठराव संमत केला गेला होता. सदर प्रस्ताव प्रचंड खर्चाचा होता. त्यासाठी खासदार विकास निधीतून ही योजना अमलात आणण्याचे ठरले होते.

Margao commercial capital of goa cctv cameras are closed
Goa Election: ज्वलंत प्रश्न ठरणार प्रचाराचे मुद्दे

पालिकेने त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तो खासदारांना सादर केला होता. त्याबाबतची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. मिळत असलेल्या माहिती प्रमाणे तो प्राथमिक टप्प्यात आहे. तो लवकर पुढे न गेल्यास व निवडणूक आचारसंहिता लागू झाली, तर तो लांबणीवर पडण्याची भिती व्यक्त होत आहे.

दुसरीकडे वर्षभरापूर्वी म्हणजे स्वप्निल वाळके यांच्या दिवसा ढवळ्या झालेल्या खुनानंतर पालिका व पोलिस यांनी एकत्र येऊन घेतलेल्या निर्णया नुसार शहरांतील तब्बल 23 जुने सीसीटीव्ही कॅमेरे खासगी ठेकेदाराकरवी दुरुस्त करून बसविले गेले. पण त्यातील केवळ एकच चालतो तर बाकीचे बंद पडले आहेत. जो चालतो त्याला स्टोरेज नाही. त्यामुळे त्याचा वापर केवळ वाहतूक नियमभंग चलनासाठी केला जातो.

Margao commercial capital of goa cctv cameras are closed
...अन्यथा झुआरी पूलावर काढणार धडक मोर्चा

‘ते’ बील रखडले!

या संबंधी केलेल्या चौकशीप्रमाणे सदर ठेकेदाराने चार महिन्यामागे आपले देखभाल बिल पालिकेला सादर केले, पण ते अजून चुकते न केल्याने त्याने काम थांबविले आहे. पालिकेने हे बिल आयटीखात्याकडे मंजुरीसाठी पाठविले आहे, अशा या किचकट कामकाज पद्धतीमुळे हा घोळ झाला आहे. मात्र मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी नवे पालिका अभियंता आर्सेकर यांना हे बील चुकते करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com