...अन्यथा झुआरी पूलावर काढणार धडक मोर्चा

वाहतूक समस्या सोडविण्यास काँग्रेसने गोवा सरकारला दिली 3 दिवसांची मुदत
Goa Congress will protest on Zuari Bridge
Goa Congress will protest on Zuari Bridge Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: झुआरी पुलाच्या बाजूने रस्ते खराब झाल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांचा रांगा लागत आहेत. रस्त्यांची डागडुजी करण्याबाबत कंत्राटदाराकडून दुर्लक्ष होऊनही कोणतीच कारवाई केली जात नाही. या पुलावरील वाहतूक कोंडीची समस्या येत्या तीन दिवसात सरकराने न सोडविल्यास धडक मोर्चा काढण्याचा इशारा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.

Goa Congress will protest on Zuari Bridge
जो पक्ष भंडारी समाजाचा मुख्यमंत्री करणार त्यांनाच आमचा पाठिंबा!

झुआरी पुलावरून दरदिवशी कामानिमित्त पणजीकडे जाणारे तसेच विमानतळाकडे जाणाऱ्या पर्यटकांना तसेच गोमंतकियांना या खराब रस्त्यांच्या समस्यांमुळे वेळेवर पोहचता येत नाही. अनेकवेळा पर्यटकांना वाहतुकीच्या कोंडीमुळे विमान चुकण्याच्या घटना घडल्या आहेत. ‘गोमेकॉ’ इस्पितळात वेळेवर उपचारासाठी पोहचणेही शक्य होत नाही. अनेकदा रुग्णवाहिका या वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडलेल्या दिसतात. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे तसेच सरकारकडून कोणतीच कारवाईचे पावले उचलली जात नसल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याची टीका चोडणकर यांनी केली.

Goa Congress will protest on Zuari Bridge
Goa Election: ज्वलंत प्रश्न ठरणार प्रचाराचे मुद्दे

नव्या झुआरी पुलाचे काम करत असताना जुन्या झुआरी पुलाच्या बाजूने खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे हे कंत्राटदाराचे कर्तव्य आहे. या खराब रस्ते व वाहतुकीच्या कोंडीमुळे दैनंदिन पणजीत येणाऱ्या प्रवशांना कामावर वेळेवर पोहचणे शक्य होत नाही. नेहमीच्या प्रवासाच्या वेळेपेक्षा हा प्रवास एका तासाने वाढला आहे. सरकार लोकांना गृहित धरत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या समस्येबाबत उत्तर देताना कंत्राटाराला रस्ता दुरुस्तीचे निर्देश दिले जातील असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे ही समस्या येत्या तीन दिवसात सरकारने न सोडवल्यास मोर्चा काढून सरकारला वेठीस धरले जाईल, असे संकेत चोडणकर यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com