कुठ्ठाळीतील खराब रस्ते Dainik Gomantak
गोवा

Goa: कुठ्ठाळीमध्ये रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते; नागरिकांची गैरसोय

रेकॉर्ड उच्च महागाईनंतर गोव्यातील (Goa) लोकांना केवळ जगातील सर्वाधिक कर लावलेल्या इंधनासाठी (fuel)खर्च करावा लागत नाही तर वाहनांच्या (vehicles) देखभालीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: कुठ्ठाळी मतदार संघातील लोकांना खड्डेमुक्त रस्ते देण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांचे अपयश उघड करण्यासाठी कुठ्ठाळी युवा काँग्रेस समिती सदस्यांनी रस्त्यावर येऊन निदर्शन केले. कुठ्ठाळी युवा काँग्रेस (Congress)समितीचे अध्यक्ष पीटर फर्नांडिस (Peter Fernandes) यांनी, सार्वजनिक बांधकाम मंत्री (Minister) दीपक पाऊसकर कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरला असल्याचा ठपका ठेवला.

पीटर फर्नांडिस म्हणाले की जेव्हापासून मंत्र्यांनी शपथ घेतली आहे तेव्हापासून राज्यातील रस्ते खराब होत चालले आहेत. तसेच कुठ्ठाळी मतदार संघातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. एका वर्षापेक्षा जास्त काळ सदर रस्ते राहिले नाहीत. आणि यामुळे कुठ्ठाळीतील लोकांची मोठी गैरसोय झाली आहे.तेव्हा याकामी मंत्री पाऊसकर सपसेल अपयशी ठरले आहेत. असा आरोप केला.

काँग्रेसचे नेते ऑलेन्सियो सिमाॅईश म्हणाले की, गोव्यात भाजपने सरकार स्थापन केल्यापासून हे सरकार त्यांची कर्तव्ये पार पाडण्यात अपयशी ठरले आहे.तसेच सरकार सर्व आघाडीत अपयशी ठरले आहे आणि सामान्य माणसाला सतत अधिक दुःख देत आहे.

रस्त्यांच्या (Road) वाईट परीस्थितीमुळे काहींना आपला जीव गमावला लागला आहे. रस्ते आणि इतर गोष्टींमुळे सामान्य माणसावर आणखी ओझे वाढले आहे. उच्च महागाईच्या रेकॉर्ड (Inflation record) नंतर गोव्यातील लोकांना केवळ जगातील सर्वाधिक कर लावलेल्या इंधनासाठी खर्च करावा लागत नाही तर वाहनांच्या देखभालीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात.

तेव्हा कुठ्ठाळी मधील रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने भरावेत अशी मागणी कुठ्ठाळी युवा काँग्रेस समितीने केली आहे.अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा समितीने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT