Zuari Bridge
Zuari Bridge Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge: नितीन गडकरी यांच्या हस्ते झुआरी पुलाच्‍या दुसऱ्या बाजूचे लोकार्पण

दैनिक गोमन्तक

Zuari Bridge: गोवा ही देशाची पर्यटन राजधानी बनू शकते. त्यासाठी केंद्र सरकारकडून गोव्याला हवे ते सहकार्य दिले जाईल. पुढील सहा महिन्‍यांत राज्‍यात 10 हजार कोटींची रस्‍ता कामे सुरू होतील. महामार्गांवरील ब्‍लॅक स्‍पॉट हटविण्‍यासाठी तातडीने 100 कोटी देण्‍यात येतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.

गडकरी यांच्या हस्ते आज भव्‍यदिव्‍य सोहळ्यात झुआरी पुलाच्‍या दुसऱ्या लेनचे लोकार्पण करण्यात आले. या पुलावर 280 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या निरीक्षण मनोऱ्याचे (व्हिविंग गॅलरी) आणि पर्वरी येथील निर्माण होणाऱ्या सहापदरी उड्डाण पुलांच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली. गडकरी म्हणाले, झुआरी पुलावर 125 मीटर उंच निरीक्षण मनोरा बांधण्यात येणार आहे.

कॅप्सुल लिफ्टमधून मनोऱ्यावर!

झुआरी पुलावर जो 125 मीटर उंच मनोरा बांधला जात आहे, पर्यटकांना बोटीतून आणून कॅप्सुल लिफ्टमधून त्यांना मनोऱ्यावर नेण्यात येणार आहे. तेथून पर्यटकांना गोव्यातील समुद्र दर्शन घेता येईल. भविष्यात या मनोऱ्याच्या पायथ्याशी ‘लाईट अँड साऊंड शो’ आयोजित करता येणे शक्य आहे, ज्यात गोव्याच्या इतिहासाचे दर्शन पर्यटकांना दाखवता येईल, असेही गडकरी म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमा

गोव्यात जास्तीत जास्त पर्यटक यायला हवे असतील, तर या राज्यातील साधनसुविधा वाढवल्या पाहिजेत. चांगली कन्वेंशन सेंटर आणि हॉटेल्स वाढली पाहिजेत. पर्यटन खात्याने त्याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांकडून आराखडा करून घ्यावा. ज्या साधनसुविधा निर्माण केल्या जातील, त्या वेळेत पूर्ण केल्या जाव्यात. तरच अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि गोव्याला जीएसटीच्या रूपाने मोठा महसूल प्राप्त होईल, असे गडकरी म्हणाले.

गडकरी म्‍हणाले...

  1. महामार्गावरील ब्‍लॅक स्‍पॉट हटविण्‍यासाठी १०० कोटी

  2. प्रदूषणमुक्त टॅक्सी सेवेसाठी खास योजना आखावी

  3. मी कधीही कंत्राटदारांकडून ‘लक्ष्‍मी दर्शन’ घेत नाही

  4. प्रगत मासळी उत्पादनातून डॉलरमध्ये पैसा कमवा

  5. झुआरीवरील आर्ट, व्ह्यू गॅलरी ठरेल ‘स्‍टेट ऑफ हार्ट’

  6. मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांची तातडीने करणार पूर्तता

व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी : कार्यक्रमाला यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत, नीलेश काब्राल, डॉ. दिव्या राणे, उल्हास तुयेकर, रुडाल्फ फर्नांडिस, केदार नाईक, वीरेश बोरकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, ॲड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT