Subhash Shirodkar Opening of industry Gomantak Digital Team
गोवा

Fruit Industry : ‘केएसएस’ सोसायटीची गरुडझेप

सुभाष शिरोडकर : ‘फळ प्रक्रिया’ उद्योगाचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Fruit Industry : ‘केएसएस’ सोसायटीची गरुडझेप सावईवेरे येथील के.एस.एस.ही सोसायटी गावातील लोकांना केवळ स्वस्त धान्य वितरण करण्यापुरतीच मर्यादित राहिली नाही तर फळ प्रक्रिया उद्योग सुरू केल्याने या संस्थेने सहकार क्षेत्रात गरुडझेप घेत ''एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ'' हे सहकार क्षेत्रातील ब्रीद वाक्य या संस्थेने सार्थ ठरवले आहे, असे गौरवोद्‍गार जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सावईवेरे येथे काढले.

येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ही संस्था यंदा ६० व्या वर्षात पदार्पण करत असल्याने सोसायटीने चालू वर्षापासून सावईवेऱ्यात ‘अंत्रुज फुड्स’ या नावाने फळ प्रक्रिया उद्योगाचे उद्‍घाटन करण्यात आले. हा प्रकल्प प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एनटरप्राईजीस एक जिल्हा एक उत्पादन, या उद्योग योजनेतून साकारत आहे.

प्रमुख पाहुणे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, संस्कृती मंत्री गोविंद गावडे, नाबार्ड रीजनल ऑफिसचे जनरल मॅनेजर डॉ. मिलिंद भिरुड, कुर्टी जिल्हा पंचायत सदस्या प्रिया चारी, सरपंचा शोभा पेरणी, इंडियन ओवरसीस बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्रीप्रकाशन, उपसरपंच बाबू गावडे, पंच अक्षय नाईक, संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्ताराम देसाई उपस्थित होते.

गोविंद गावडे म्हणाले, बेरोजगारीची समस्या सध्या युवकांना भेडसावत आहे. सर्वच युवकांना काही सरकारी नोकरी देणे शक्य होत नाही. या सोसायटीने हा फळ प्रक्रिया प्रकल्प सुरू करून गावातील युवा युवतींना काही प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याने या संधीचा युवकांनी लाभ घ्यावा.

शोभा पेरणी, प्रिया चारी, श्रीप्रकाशन, मिलिंद भिरूड यांनीही विचार मांडून सोसायटीच्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सावईवेरे येथील संजय पाटील यांना ‘फार्मर्स अवॉर्ड’ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रनिवेदन सुभाष जाण यांनी केले तर बाबू गावडे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT