Goa News |Shree Saptakoteshwar Temple Dainik Gomantak
गोवा

Saptakoteshwar Temple: सप्तकोटेश्वर मंदिराचे शनिवारी लोकार्पण

नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून 11 फेब्रुवारी रोजी या मंदिराचे लोकार्पण करण्यात येईल.

दैनिक गोमन्तक

Saptakoteshwar Temple: छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुनर्बांधणी केलेले नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून 11 फेब्रुवारी रोजी या मंदिराचे लोकार्पण करण्यात येईल. यासाठी 9 फेब्रुवारीपासून धार्मिक विधी सुरू होतील.

गोव्याबरोबर महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील पवित्र जलाचा सप्तकोटेश्वराला अभिषेक करण्यात येईल. यासाठी छत्रपतींचे वंशज शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

पोर्तुगीज काळात उद्ध्वस्त केलेल्या 19 मंदिरांच्या पुनरुत्थानासाठी अर्ज आले असून यासंबंधी सहाजणांची तज्ज्ञ समिती अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज दिली. पोर्तुगिजांच्या राजवटीत शेकडो मंदिर उद्ध्वस्त करण्यात आली. गोवा मुक्तीनंतर यासंदर्भात कोणताच निर्णय झाला नाही.

आता यासंदर्भात कागदोपत्री, लेखी, प्राचीन पुरावे सादर करावेत, असे आवाहन पुरातत्व खात्याने केले होते. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत यासाठी 19 अर्ज आले असून ते विविध सामाजिक संस्था, बिगर सरकारी संस्था आणि व्यक्तिगत स्वरूपात नागरिकांनी केले आहे.

यासंबंधी राज्य सरकारच्या वतीने नेमलेली सहा तज्ज्ञ व्यक्तींची समिती अंतिम निर्णय घेणार आहे. हा अंतिम निर्णय राज्य सरकारला मान्य असेल. त्यानंतर सरकार यावर अंमलबजावणी आणि कार्यवाही करेल, असे पुरातत्व खात्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले. यामध्ये प्रामुख्याने बार्देश, सासष्टी, तिसवाडी या तालुक्यांमधील मंदिरांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT