Inauguration of project for sewage treatment in cortalim Dainik Gomantak
गोवा

कुठ्ठाळीत सांडपाणी प्रक्रियेसाठी प्रकल्पाचा शुभारंभ; आमदार आंतोन वास यांचे इतर पंचायतींना आवाहन

कुठ्ठाळी मतदारसंघातील सांडपाणी समस्या सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

दैनिक गोमन्तक

कुठ्ठाळी मतदारसंघातील सांडपाणी समस्या सध्या चर्चेचा विषय बनले आहे. यावर कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वास म्हणाले की, कुठ्ठाळी मतदारसंघातील सांडपाणी समस्या सोडविण्यासाठी पंचायतीने पुढे यावे. पंचायतींनी जागेची निवड केल्यास तेथे स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येईल.

कुठ्ठाळी पंचायतीच्या किलपाऊलो-केसरव्हाळ भागात स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार वास यांच्या हस्ते करण्यात आला. सदर प्रकल्प लहान असून त्यासाठी सुमारे 55 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

कुठ्ठाळी मतदारसंघातील हा पहिलाच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. इतर पंचायत क्षेत्रातही अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तिथे जागेची अडचण असल्याने प्रकल्प उभारण्यास अडथळे येतात. पंचायतींनी जागा दिल्यास तिथेही असे प्रकल्प उभारण्यात येतील, असे वास यांनी स्पष्ट केले.

सरपंच सेनिया परेरा यांनी सांगितले की, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने नागरिक सांडपाणी थेट गटारामध्ये सोडतात. या प्रकल्पामुळे ती समस्या दूर होण्यास मदत होईल. जे नागरिक गटारामध्ये सांडपाणी सोडतात, त्यांचे वीज, पाणी जोडणी कापण्यात येते; पण ती दोन दिवसांमध्ये पुन्हा कोणीतरी जोडून देण्याचे प्रकार पूर्वी होत असे.

परंतू आता जोपर्यंत संबंधित व्यक्ती सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सुविधा निर्माण करीत नाही तोपर्यंत वीज,पाणी जोडणी जोडली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT