साखळीत कदंब बसस्थानकाचे उदघाटन

 

Dainik Gomantak

गोवा

साखळीत अत्याधुनिक कदंब बसस्थानकाचे उदघाटन

साखळीचा मास्टर प्लान डोळ्यांसमोर ठेवून नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच साखळीत असंख्य विकासकामे राबवली. स्वच्छ व सुंदर साखळी, हेच माझे ध्येय आहे, असे उदगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

दैनिक गोमन्तक

साखळी: साखळीचा मास्टर प्लान डोळ्यांसमोर ठेवून नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच साखळीत असंख्य विकासकामे राबवली. स्वच्छ व सुंदर साखळी, हेच माझे ध्येय आहे, असे उदगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

साखळी (Sanquelim) येथील नवीन अत्याधुनिक कदंब बसस्थानकाचे (Kadamba Bus Stand) उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री (CM Pramod Sawant) बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, कदंब महामंडळाचे चेअरमन दीपक नाईक, साधनसुविधा विकास महामंडळाचे संचालक दत्ताराम चिमुलकर, नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, भीमराव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सावंत म्हणाले, साखळीच्या सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारत मोडकळीस आली होती. तिची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी महाविद्यालयाच्या इमारतीचा विस्तार करून दर्जा वाढविण्यात आला. गेली 15 वर्षे रेंगाळत पडलेले साखळीचे मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित केले. गृहनिर्माण वसाहतीमध्ये राखीव जागेत नवीन सभागृह तसेच वन खात्यातर्फे उपवन विभाग निर्माण करून औषधी झाडे लावली. बालोद्यान उभारले, अशी माहिती सावंत यांनी दिली. आनंद काणेकर यांनी स्वागत केले, तर सिध्दी पोरोब यांनी आभार मानले.

पाचशे विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध

साखळी येथील साई नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या स्वतंत्र इमारतीचे काम सुरू आहे. या इन्स्टिट्यूटमधून पाचशे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांना रोजगार लाभला आहे. साखळी पालिकेतर्फे जी विकासकामे केली जातात, त्यालाही शंभर टक्के विकासनिधी सरकारतर्फे पुरवला जातो. होंडा जंक्शन ते साखळी हॉस्पिटल जंक्शनचे रुंदीकरण व विद्युत रोषणाईने सुशोभीकरण लवकरच करण्यात येईल, असे सावंत यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT