देशी-विदेशी पर्यटकांची समुद्रकिनाऱ्यांवर रेलचेल...

नाताळाचा (Christmas) उत्‍साह आणि नववर्षाची (New Year) लागलेली चाहूल या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील कोलवा समुद्रकिनारा (Colva Beach) देशी-विदेशी पर्यटकांनी (Tourists) फुलून गेला आहे.
Goa Tourism

Goa Tourism

Dainik Gomantak 

Goa Tourism : नाताळाचा उत्‍साह आणि नववर्षाची लागलेली चाहूल या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील कोलवा समुद्रकिनारा देशी-विदेशी पर्यटकांनी फुलून गेला आहे. पर्यटकांची ही रेलचेल नववर्ष साजरे होईपर्यंत असणार आहे, असे येथील पर्यटन व्‍यावसायिकांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Goa Tourism</p></div>
Restaurants in Goa:गौरी आणि सुहानचं 'पेस्ट्री कॉटेज'

कोरोनामुळे गेल्यावर्षी या काळात हा जगप्रसिद्ध किनारा ओस पडला होता. यंदा मात्र कोरोनाचे सावट कमी झाल्‍यामुळे किनाऱ्यावर (Colva Beach) गर्दी होऊ लागली आहे. महाराष्‍ट्र, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, कर्नाटक तसेच इतर राज्यांतून देशी पर्यटक (Tourists) ख्रिसमस (Christmas) तसेच नवे वर्ष (New Year) साजरे करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच येथे दाखल झाले आहेत. साहजिकच येथील पर्यटन व्यवसायालाही (Goa Tourism) गती मिळाली आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Tourism</p></div>
दिगंबर कामत यांना पराभूत करणे हेच ध्‍येय...

ताज्‍या, फडफडीत मासळीची चवही मनमुराद

अरुणाचल प्रदेश येथून आपल्या कुटुंबासोबत आलेले दीपेंद्र साहू यांनी सांगितले, सरते वर्ष साजरे करण्यासाठी देशातील हे एक उत्तम ठिकाण आहे. डिसेंबरच्या सुरूवातीला आम्‍ही येथे दाखल झालो आहोत. येथील ताज्‍या, फडफडीत मासळीची चवही मनमुराद घेण्‍यास आपल्याला आवडते.

हा किनारा आमचा आनंद द्विगुणीत करतो

महाराष्ट्रातील देवगड येथून आपल्या मित्रमंडळींसोबत आलेला सागर किनळेकर म्हणाला, गोव्यातील प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर कमालीची स्वच्छता पाहायला मिळते. कामावर सुट्टी घेऊन आम्ही सर्वजण या किनाऱ्यावर येत असतो. निसर्गाचा आनंद आणि सुट्टीत धमाल करण्यासाठी हा किनारा आमचा आनंद द्विगुणीत करतो.

पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद काही औरच

वर्षाची शेवटची संध्‍याकाळ आणि नववर्षाची सकाळ साजरी करण्यासाठी मी कोलवा किनाऱ्यावर दरवर्षी येतो. मात्र गतसाली कोरोनामुळे ती संधी हुकली. या किनाऱ्यावरील वाळूत आणि पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद काही औरच, असे दिल्ली येथील पर्यटक मुन्ना मेहता म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com