Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: लोकसभा निवडणूकीत माझा पाठिंबा भाजपलाच- चर्चिल

प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने गोव्यात चांगले आणि विकासपूरक प्रशासन दिले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

"प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने गोव्यात चांगले आणि विकासपूरक प्रशासन दिले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत मी भाजप उमेदवारालाच दक्षिण गोव्यात पाठिंबा देईन" अशी घोषणा बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली.

दोन वेळा लोकसभेवर निवडून आलेले आलेमाव यांना पत्रकारांनी आज येणारी लोकसभा निवडणूक तुम्ही लढवणार का असे विचारले असता, मी निवडणूक लढवावी असा आग्रह मला होत आहे तरीही मी भाजप उमेदवारालाच पाठिंबा देणार असे त्यानी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सोमवारी आपल्या वयाची पन्नाशी गाठत आहेत त्यानिमित्ताने आलेमाव यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मदतीने मी बाणावली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला असा दावा त्यांनी केला. त्यावेळी मी रस्त्यावरच सुमारें 200 कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे असे ते म्हणाले.

वेंझी हे फक्त 'व्हॉट्स ॲप'आमदार

बाणावलीचे आप आमदार हे विकासकामे करण्यास पूर्णतः कुचकामी ठरले आहेत. आता त्यांची ओळख फक्त 'व्हॉट्स ॲप आणि ड्रोन' आमदार एव्हढीच करणे शक्य आहे अशी टीका माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली.

आज वार्का येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार विएगस यांच्यावर टीका करताना निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघांत एक तरी स्वतःचे काम केले आहे का हे त्यांनी स्पष्ट करावे.

मी आमदार असताना मी 200 कोटींची विकासकामे मंजूर करून आणली. आताचे आमदार जी कामे केल्याचे दाखवितात ती मी मंजूर केलेली आहे असा दावा आलेमाव यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT