Goa Congress: पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनी हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांचे काय? - काँग्रेस

वेर्णा पोलीस ठाणे हे अलीकडच्या काळात सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून गौरविण्यात आले होते.
Crime
CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress पोलिसांच्या उपस्थितीत गोव्यातील निष्पाप जनतेवर हल्ले होत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सध्या ढासळली असून गोवा उत्तर प्रदेशच्या वाटेने जात आहे का? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

वेर्णा पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावर काँग्रेसचे कोषाध्यक्ष ऑर्विल डौराडो यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत अमित पाटकर यांनी वेर्णा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करूनही हल्लेखोरांना अद्याप पकडण्यात आले नसल्याने सरकारचा निषेध केलाय.

Crime
Goa Police: गोवा पोलिसांना हे शोभतं का? अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ

काँग्रेसचे ऑर्विल डौराडो यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी पोलीस निरीक्षक डिएगो ग्रेशियस हे घटनास्थळापासून अवघ्या 5 मीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यांच्यासोबत दोन कॉन्स्टेबल आणि एक पोलिस उपनिरीक्षक उपस्थितीत असूनही हा हल्ला झाला, असा घणाघात अमित पाटकर यांनी केलाय.

Crime
Mhadei : शहा यांचे म्हादईसंदर्भातील वक्तव्य फक्त ‘राजकीय विधान’ ; शुभम नार्वेकर

"या हल्ल्यात आमच्या कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झालीय. तसेच त्यांच्याकडील चष्मा, आयफोन यांसारख्या मौल्यवान वस्तूंचे देखील नुकसान करण्यात आलेय. हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या घडला असून हे गोव्यातील वाढत्या गुंडगिरीचे उदाहरण आहे.

वेर्णा पोलीस ठाणे हे अलीकडच्या काळात गोव्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून गौरविण्यात आले होते. राज्यातील सर्वोत्तम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे खुनी हल्ले होत असतील तर निष्पाप नागरिकांचे भवितव्य काय?" असा प्रश्न देखील अमित पाटकर यांनी उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com