फोंडा: मागील 8 वर्षात फोंड्यातील रस्त्यांवर झालेल्या अपघातांमध्ये 222 लोकांनी आपला जीव गमावला आहे. येथे वार्षिक सरासरी 27 मृत्यू आहे. फोंडा पोलिसांकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. (Road Accidents in Goa)
फोंडातील (Phonda) लोकांनी यावर चिंता व्यक्त केली असून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे सरकारला आवाहन केले आहे. महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि सूचनाफलक लावून रस्ते आणि महामार्ग सुधारण्याची गरज असल्याचे लोकानी नमूद केले आहे.
तीव्र वळण असलेल्या रस्त्यांव्यतिरिक्त ओव्हरस्पीडिंग आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन हे अपघातांचे (Accident) मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. दरवर्षी रस्ते सुरक्षा आणि वाहतूक जागृती कार्यक्रम आयोजित करूनही रस्ते अपघात कमी झालेले नाहीत.
“वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वार आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी," असे फोंड्यातील लोकांचे म्हणणे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.