Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: कन्हैयाकुमार मृत्यू प्रकरणी 'तो' ट्रक जप्त, चालक फरार; मायणा-कुडतरी पोलिसांची कारवाई

Goa Murder Case: कन्हैयाकुमारचा केवळ अपघाती मृत्यू नसून, घातपाताचा प्रकार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिस तपासाची चक्रे झपाट्याने फिरली.

dainik gomantak team

कन्हैयाकुमारचा केवळ अपघाती मृत्यू नसून, घातपाताचा प्रकार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिस तपासाची चक्रे झपाट्याने फिरली. मायणा-कुडतरी पोलिसांनी कर्नाटकहून (Karnataka) या अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक जप्त करुन आणला.

मात्र, हा ट्रक चालवणारा चालक अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. जो ट्रक जप्त केला आहे, त्याची आज फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात आली.

दरम्यान, या ट्रकचा पत्रा कुठेही तुटलेला नाही. त्यामुळे मृताच्या अंगावर ज्या जखमा सापडल्या, त्या ट्रकचा पत्रा लागून झाल्याची शक्यताही फेटाळण्यात आली आहे.

25 जून रोजी लोटली येथे वेर्णा औद्योगिक वसाहत सुरु होते, त्या रस्त्यावर पोलिसांना कन्हैयाकुमारचा मृतदेह सापडला होता. त्याच्या अंगावरुन गाडी गेल्याचे दिसून आल्यावर पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून केस नोंद केली होती.

तिघांची चौकशी सुरु

कन्हैयाकुमारला लोटली येथे फोंडा (Ponda) पोलिसांनी रॉबर्ट व्हॅनमधून आणून सोडले होते. त्यामुळे या पोलिसांचीही चौकशी सुरू झाली असून फोंडा पोलिस स्थानकाशी संलग्न असलेला एक हवालदार आणि दोन पोलिस शिपायांची चौकशीही सुरू झाली आहे. हे प्रकरण पोलिसांवर शेकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सीआयडी कक्षात ‘फ्री स्टाईल’ हाणामारी

सध्या पोलिसांची एक एक प्रकरणे पुढे येत असतानाच मडगाव सीआयडी पोलिस कक्षात झालेली ‘फ्री स्टाईल’ हाणामारी, हाही एक चर्चेचा विषय बनला आहे. हप्ता वसुलीवरून दोन पोलिसांत वाद होऊन ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात आले. हे पोलिस भांडत भांडत अगदी पोलिस कॅन्टीनपर्यंत आल्याने या प्रकरणाचा गवगवा झाला.

एका शिपायाला वरच्या हुद्द्यावरील एका अधिकाऱ्याने ‘काहीही कर; परंतु दरमहा 3 हजार रुपये हप्ता म्हणून आपल्याकडे जमा कर’, अशी ताकीद दिल्यामुळेच हा वाद सुरु झाला आणि त्यातूनच वादावादी सुरु होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाल्याचे सांगण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT