SSC Board Exam Result | Goa Board Exam Results  Dainik Gomantak
गोवा

Goa Board SSC Result 2023: दहावीचे विद्यार्थी भाषा विषयात निघाले कच्चे

गणिताचा टक्का वाढला : ९६.६४ टक्के निकाल

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Board SSC Result गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

यंदाही नेहमीप्रमाणे उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. दहावीचा निकाल 96.64 टक्के लागला. या परीक्षेत इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणीसह अन्य भाषांचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरला असून शास्त्र आणि गणितामध्ये मात्र टक्का वाढला आहे.

पर्वरी येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयातील परिषद सभागृहात मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी या निकालाची घोषणा केली. यावेळी मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक, उपसचिव भारत चोपडे, साहाय्यक सचिव शीतल कदम उपस्थित होत्या.

यावेळी भगीरथ शेट्ये म्हणाले की, मागील वर्षी दहावीचा निकाल ९२.७ टक्के लागला होता. यंदा त्यात सुधारणा होऊन हा निकाल ९६.६४ टक्के इतका लागला आहे.

एकूण १९ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी १९ हजार २८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ९६.९२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून ९६.३७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

१८७ शाळांचा निकाल १०० टक्के

यावर्षीच्या निकालामध्ये राज्यातील एकूण ..... शाळांपैकी १८७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून त्यामध्ये फोंडा तालुक्यातील ३१ शाळांचा समावेश आहे. त्याखालोखाल सासष्टीतील २५, तर तिसवाडी, पेडणे आणि येथील प्रत्येकी १८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

१९७ मुलांना क्रीडा गुणांचा लाभ

दहावीला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७१५१ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ झाला असून यातील १९७ विद्यार्थी क्रीडा गुणांमुळेच तरले. हे प्रमाण १.०२ टक्के आहे.

एसटी, ओबीसींची बाजी

यंदाच्या दहावी निकालात सर्वाधिक ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याचे प्रमाण ९८.३६ टक्के आहे. त्या खालोखाल एसटी विद्यार्थ्यांचा क्रमांक लागतो. त्यांचे प्रमाण ९८.३४ टक्के आहे. तर सर्वसाधारण गटाचे प्रमाण ९६.११ आहे. एससीचे प्रमाण सर्वांत कमी ९६.०९ टक्के आहे.

विशेष विद्यार्थ्यांचा निकाल १०० टक्के

राज्यातील चारही विशेष विद्यार्थ्यांच्या शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून यात संजय स्कूल पर्वरी, सेंट झेवियर अकादमी जुने गोवे आणि ढवळी येथील लोकविश्‍वास प्रतिष्ठानच्या दोन शाळांचा यात समावेश आहे.

पेडणे तालुक्याने मारली बाजी

दहावी परीक्षेत पेडणे तालुक्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वाधिक म्हणजेच ९८.९४ इतकी आहे. या तालुक्यातील १०३६ विद्यार्थ्यांपैकी १०२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुरगाव तालुक्यात सर्वांत कमी ९५.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुरगाव तालुक्यातील १७३७ विद्यार्थ्यांपैकी १६५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जूनच्या मध्यावर पुरवणी परीक्षा

दहावीतील उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मंडळाने आणखी एका पुरवणी परीक्षेची संधी दिली असून जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत किंवा एटीकेटी मिळाली आहे, अशांना पुरवणी परीक्षा देता येणार आहे.

याशिवाय जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, मात्र समाधानकारक गुण मिळाले नाहीत, असे विद्यार्थी पुरवणी परीक्षेला बसू शकतात. ही परीक्षा जूनच्या मध्यावर होईल.

सध्याच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असल्यास २५ मे पर्यंत ते फोटो कॉपी मागवू शकतात आणि २९ मे पर्यंत पुनर्मुल्यांकनासाठी शाळांमार्फत अर्ज भरू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल'! विश्‍वजीत राणेंचे प्रतिपादन; वाळपईत ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वाटप

मनोज परबांपेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम, घाटी – घाटी करुनच त्यांचा आमदार निवडून आला; मेटींचा पलटवार

Bird week in India: 'चला, पक्षी वाचवूया, निसर्ग जपूया'! पक्षीशास्त्राचे जनक 'डॉ. सलिम अली' यांचे स्मरण

Serendipity Art Festival: देऊस नोस आकुडी, डबल बील; सेरेंडिपिटी कला महोत्सवातील विशेष नृत्य सादरीकरणे

Birsa Munda Jayanti: भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त 8000 दुचाकीस्‍वारांची शोभायात्रा! 15 नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा, कार्यक्रमांची मेजवानी

SCROLL FOR NEXT