Monsoon News: खूशखबर... अंदमान बेटावर धडकला मान्सून

गोव्यातही वेळेत दाखल होण्याची शक्यता : 22-23 रोजी मेघगर्जनेसह सरी बरसणार
Monsoon
MonsoonDainik Gomantak

Monsoon News बहुप्रतिक्षित मान्सून अखेर अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूनने हजेरी लावली आहे.

दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, निकोबार आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागांत मान्सून दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. अशी स्थिती राहिल्यास मान्सून केरळ आणि गोव्यातही वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे.

येत्या तीन-चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.  

यावेळी मान्सून एक जूनऐवजी चार जूनला  केरळमध्ये  दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच व्यक्त केला होता.

Monsoon
Mahadayi Water Dispute: सागराच्या साक्षीने म्हादई नदी वाचविण्याची साद

गोव्यात 6 ते 10 जूनपर्यंत आगमन : स्कायमेट संस्थेच्या अंदाजानुसार गोव्यात मान्सूनचे आगमन 6 ते 10 जूनपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबईत15 जूनपर्यंत मान्सून पोहोचेल. यंदा भारतामध्ये सरासरी 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असला, तरी यात बदल होण्याची शक्यता स्कायमेट संस्थेने व्यक्त केली आहे.

Monsoon
Margao News: कचरा गोळा करणारा युवक विजेच्या धक्क्याने ठार

उष्णतेची लाट

नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल वेगाने सुरू झाल्याने अरबी समुद्र आणि संलग्न भूखंडीय प्रदेशात मोठे हवामान बदल जाणवत आहेत. परिणामी पुढील काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते.

दक्षिण उत्तर प्रदेशात 20 ते 22 मे दरम्यान, देशाच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तसेच गोव्यात 22 व 23 मे रोजी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com