Locals March on Pernem Police Station Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पेडणेत परप्रांतीयांची गुंडगिरी; अल्पवयीन मुलीवर हल्ला; स्थानिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

Locals March on Pernem Police Station: पेडणेत एका स्थानिक अल्पवयीन मुलीवर प्रतप्रांतिय नागरिकाकडून हल्ला करण्यात आला होता.

Manish Jadhav

Goa News: गोव्यात मागील काही दिवसांत स्थानिकांवरील हल्ले वाढले आहेत. परप्रांतियांकडून स्थानिकांना निशाणा बनवलं जात आहे. काही दिवसांपूर्वी, पेडणेत एका स्थानिक अल्पवयीन मुलीवर प्रतप्रांतिय नागरिकाकडून हल्ला करण्यात आला होता. यातच आज (11 ऑक्टोबर) या हल्ल्याप्रकरणी स्थानिकांनी पेडणे पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.

या हल्ल्याच्या तपासाची सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी पेडणेवासीय पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाडेकरुंची पडताळणी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. तर दुसरीकडे, तपास सुरु असून लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली जाईल असे पेडण्याच्या पोलिस निरीक्षकांनी सांगितले.

भाडेकरु पडताळणी मोहीम

गोव्यात (Goa) जुलै महिन्यापासून भाडेकरु पडताळणी मोहीम सुरु आहे. रोजगाराच्या शोधात गोव्यात लोकं येत असतात आणि त्यांची ओळख पटावी आणि राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी म्हणून सरकारने ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेतून गोव्यात राहणाऱ्या भाडेकरुंची गुन्हेगारी पार्श्वभूमी ओळखण्यात पोलिसांना मदत होणार असल्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

गुन्हेगारांचा शोध

घर मालकांकडून वेळोवेळी भाडेकरुंची माहिती पोलिसांना न दिल्याने गुन्हेगारांचा शोध घेणं कठीण झालं होतं. धारबांदोडा, फोंडा, वाळपई अशा विविध भागांमध्ये पोलिसांनी जात या मोहिमेबद्दल जागृती निर्माण करत भाडेकरुंच्या पडताळणीला सुरुवात केली. राज्यभरातून या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि जवळपास हजारोंच्या संख्येत लोकांनी अर्ज भरुन दिल्याची माहिती सामोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT