Court
Court Dainik Gomantak

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

Goa Fast Track Court: ओडिशास्थित व गोव्यात डिलिव्हरीच्या कामाला असलेल्या अभिषेक महानायक याला जलदगती न्यायालयाने जामीन फेटाळला.
Published on

Goa Crime: विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार व फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ओडिशास्थित व गोव्यात डिलिव्हरीच्या कामाला असलेल्या अभिषेक महानायक याला जलदगती न्यायालयाने जामीन फेटाळला. त्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे.

त्याने अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास लावले. तो ओडिसाचा असल्याने तो पसार होण्याचा तसेच साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवले आहे.

Court
Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

संशयित अभिषेक महानायक याच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात गुन्ह्याचे पुरावे आहेत. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. तिला गर्भपातही करण्यास लावल्याचे पुरावे आहेत. त्याने पीडितेच्या गैरफायदा उठवून अत्याचार केला आहे. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले असले तरी अजून साक्षीदारांची साक्ष होणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com