Goa Corona Dainik Gomantak
गोवा

Goa Corona: ऑक्सिजन प्लँट सज्ज ठेवा... केंद्राची गोवा सरकारला सूचना

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभुमीवर नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

Akshay Nirmale

Goa Corona: जगभरात पुन्हा कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा उगम झालेल्या चीनमधध्ये पुन्हा कोरोना संसर्गाने कहर केला आहे. त्या पार्श्वभुमीवर आता जगभरात काळजी घेतली जात आहे. भारतातही केंद्र सरकारने विमानतळावर तपासणीसह विविध पातळ्यांवर तयारी केली आहे. कोरोनाविषयक दिशानिर्देंशांचे पालन करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे.

गोवा हे राज्य देशाची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. विशेषतः ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या पार्श्वभुमीवर गोव्याकडे पर्यटकांचा ओढा वाढत असतो. त्याच पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गोवा सरकारलाही कोरोनाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

यामध्ये राज्याने पुरेसा लिक्विड ऑक्सिजनचा साठा ठेवावा तसेच एसएपी हे ऑक्सिजनचे जे मिनी प्लँट असतात, तेदेखील तत्पर ठेवावेत असे म्हटले आहे. ऑक्सिचन सिलिंडरचा पुरेसा साठा करा, असेही यात म्हटले आहे. कोरोनाच्या रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत असते. यापुर्वीच्या कोरोनाच्या लाटेत याची अनुभुती देशाने घेतली आहे. त्यामुळे ती उणीव पुन्हा भासू नये म्हणून ही सूचना करण्यात आली आहे.

याशिवाय मॉक ड्रील घ्यावात, अशी सूचनाही राज्य सरकारला करण्यात आली आहे. जेणेकरून राज्य सरकार अशा आपत्तीला तोंड देण्यासाठी कितपत तयार आहे, याचीही जाणीव होऊ शकते. त्यातून समोर येणाऱ्या त्रुटींवर काम करावे, असे सरकारने म्हटले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊन लागू केल्याचा मोठा तोटा देशाला अर्थव्यवस्थेला बसला होता, त्यामुळे लॉकडाऊन कुठल्याही परिस्थितीत लागू करण्याची मानसिकता केंद्राची नाही तसेच नागरिकांचीही लॉकडाऊनमध्ये राहण्याची मानसिकता नाही. हे लॉकडाऊन टाळता यावे, म्हणूनच केंद्राकडून राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Davorlim Saw Mill Fire: दवर्लीत भीषण आग! सॉ मिल जळून खाक; 50 लाखांच्या नुकसानीचा अंदाज

Morjim Beach: मोरजीकिनारी कासवांचे अस्तित्व धोक्यात! रेतीउपशामुळे गंभीर परिणाम; पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त

Nitin Nabin Goa Visit: ‘भाजप’कडून जय्यत तयारी! कसा होणार 'नितीन नवीन' यांचा गोवा दौरा? वाचा सविस्तर..

Dual Citizenship: "परदेशातील गोमंतकीयांना न्याय द्या"! आमदार सरदेसाईंनी केली दुहेरी नागरिकत्‍वाची मागणी Watch Video

Goa Fraud: 'मी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी बोलतोय'! तोतया ऑफिसरने साधला डाव; कॅफेमालकाला घातला 9 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT